आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील सिंचनासाठी 13651 कोटींचा निधी; 91 सिंचन प्रकल्पांना फायदा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्र सरकारने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागातील अर्धवट स्थितीत असलेल्या ९१ लघु, मध्यम आणि मोठ्या सिंचन प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी १३,६५१.६१ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. अर्थ मंत्रालयाच्या खर्च वित्त समितीने जलसंपदा मंत्रालयाचा प्रस्ताव मंजूर केला. अधिकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंजूर झालेल्या निधीतून विदर्भ, मराठवाडा आणि इतर दुष्काळग्रस्त भागातील ८३ लघु, ८ मध्यम तसेच मोठ्या सिंचन योजना पूर्ण करण्यात येतील. दुष्काळाचा सामना करणाऱ्या राज्यातील अनेक जिल्ह्यांना या योजनांचा फायदा होणार.

 

त्यात विदर्भ, मराठवाडा आणि इतर दुष्काळग्रस्त जिल्ह्यातील जवळपास ३ लाख ७७ हजार हेक्टर क्षेत्रावरील जमीन सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे,
असे केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाने म्हटले आहे. 


महाराष्ट्र राज्याला नाबार्डच्या माध्यमातून मदत पुरवली जाणार आहे. या योजनांना पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्याचा विचारही करण्यात आला आहे. यानुसार लघु प्रकल्प दोन वर्षांत पूर्ण करायचे असून मध्यम तसेच मोठ्या प्रकल्पांना पूर्ण करण्यासाठी २०२२-२३ पर्यंत पूर्ण करण्याचा विचार असल्याचे जलसंपदा मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...