आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तान, चीनच्या सीमेवर तैनातीसाठी 15 सैन्य तुकड्या; 9 तुकड्या आयटीबीपीत, 6 BSFमध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- पाकिस्तान, बांगलादेश आणि चीनच्या सीमा आणखी भक्कम करण्यासाठी १९ नवीन लष्करी तुकड्या स्थापन करण्याची सरकारची योजना आहे. त्यापैकी सहा तुकड्या सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) तर नऊ तुकड्या भारत-तिबेट सीमा पोलिसात (आयटीबीपी) असतील. गृह मंत्रालयाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. या दोन्ही दलांच्या प्रत्येक लष्करी तुकडीत १ हजार जवान आणि अधिकारी असतात.  


बीएसएफच्या सूत्रांनी सांगितले की, आमच्या दलात मनुष्यबळ वाढवण्याचा विचार सुरू आहे. या तुकड्या भारत-बांगलादेश सीमेवर आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये तैनात करण्यात येतील. त्याशिवाय भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवर विशेषत: पंजाब आणि जम्मू या भागांत परिणामकारक गस्त घालण्यासाठी आणखी काही तुकड्यांची गरज आहे. बांगलादेश आणि पाकिस्तानमधून घुसखोरी, अमली पदार्थांची तस्करी आणि अवैध स्थलांतर या समस्या आहेत. त्यामुळे तेथे या तुकड्या तैनात केल्या जातील.  आयटीबीपीकडे ३ हजार ४८८ किमी लांबीच्या सीमेचे संरक्षण करण्याची जबाबदारी आहे. आम्हाला प्रत्यक्षात १२ तुकड्यांची गरज आहे, पण नजीकच्या काळात किमान नऊ तुकड्या अत्यावश्यक आहेत, अशी माहिती आयटीबीपीच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने दिली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनशी वारंवार संघर्ष उद्भवत असल्याने आयटीबीपीला आपल्या तुकड्या वाढवण्याची आवश्यकता भासत आहे.  
 

४७ चौक्यांना मंजुरी
गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, नवीन तुकड्या स्थापन केल्यामुळे बीएसएफ आणि आयटीबीपी या दोन्ही दलांना आपल्या जवानांची सीमेवर तैनाती करणे आणखी सोपे होईल. हिमालयातील सीमा भागातील गस्त आणखी कडक करण्यासाठी आयटीबीपीला ४७ चौक्या स्थापन करण्यासाठी अलीकडेच मंजुरी मिळाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...