आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षभरात विमान प्रवाशांत 19% वाढ; भाडे 18% कमी; ‘दिव्य मराठी’चा विशेष वृत्तांत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- गेल्या पाच वर्षांत देशात विविध विमान कंपन्यांनी आपल्या आसन व्यवस्थेत ६४% वाढ केली आहे. २०१६-१७ मध्ये देशभरात विमान कंपन्यांच्या एकूण जागा १२.३० कोटी होत्या. या वर्षी ऑक्टोबरपर्यंत देशांतर्गत प्रवासासाठी एकूण ११ कोटी आसने आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी २.३६ कोटी जागा उपलब्ध आहेत. १७.१% वाढीसह भारतीय विमान उद्योग २०२० पर्यंत चीन आणि अमेरिकेनंतर जगातील तिसरी सर्वात मोठी बाजारपेठ असेल. एवढेच नाही तर २०३० पर्यंत भारतीय विमान उद्योग जगातील तिसरा मोठा बाजार होईल.


देशात सध्या १० कोटींपेक्षा जास्त प्रवासी देशांतर्गत मार्गावर विमान प्रवास करतात. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या इंडिया ब्रँड इक्विटी फाउंडेशन या संस्थेच्या अभ्यासानुसार, २०२० पर्यंत हा आकडा ४२.१ कोटींपर्यंत पोहोचू शकतो. त्यानुसार सध्या भारताचा विमान उद्योग २१.५ टक्के वाढीसह जागतिक स्तरावर नवव्या क्रमांकावर आहे. तिकीट स्वस्त असल्याने तो वेगाने वाढत आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे (एएफआय) अध्यक्ष डॉ. गुरुप्रसाद महापात्रा म्हणाले की, भविष्यात प्रवाशांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन प्राधिकरण १६ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या योजनांवर काम करत आहे. एएफआय आगामी तीन वर्षांत चेन्नई आणि कोलकातात नव्या विमानतळांच्या निर्मितीसह इतर विमानतळावरील टर्मिनल आणि धावपट्टीच्या विस्तारावर काम करत आहे.


दुसरीकडे, उड्डयन मंत्रालयानुसार, २०१५ च्या सरासरी भाड्याच्या तुलनेत २०१६ मध्ये विमान भाडे १८ टक्क्यांनी कमी झाले आहे. तज्ज्ञांच्या मते, त्याचे सर्वात मोठे कारण इंधनाचे घटते दर आणि जेट लाइट, इंडिगो तसेच एअर इंडिया या विमान कंपन्यांमध्ये नव्या मार्गावर वाढती स्पर्धा हे आहे. देशात गेल्या पाच वर्षांत सतत विमानांची संख्या वाढत आहे. २०१६-१७ मध्ये ही वाढ १०.७% होती. त्याचबरोबर देशातील कंपन्यांकडील विमानांची संख्या ४९६ झाली आहे. पाच वर्षांआधी ती फक्त ३७८ ए‌वढीच होती.

 

विमानांची संख्या ३ वर्षांत होणार दुप्पट

नागरी उड्डयन मंत्रालयाने दिलेल्या आकड्यांनुसार २०२० पर्यंत भारतीय विमान कंपन्यांकडे सुमारे १५१४ विमानांचा ताफा असले. आगामी तीन वर्षांत प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन विविध कंपन्यांनी आतापर्यंत ९८३ विमानांच्या खरेदीच्या ऑर्डर दिल्या आहेत. सध्या भारतात ५३७ विमानांचा ताफा आहे. एकूण ११ विमान कंपन्या उड्डाणे संचालित करत आहेत. सर्वात जास्त १५१ विमाने एअर इंडियाकडे आहेत तर १४४ विमाने इंडिगोकडे आहेत. सर्वाधिक ४७.३४ लाख जागा इंडिगो या विमान कंपनीकडे आहेत.

 

विमान प्रवासाचे भाडे कमी होण्याची कारणे

 

पाच वर्षांत विविध कंपन्यांनी आपल्या ताफ्यात १५६ विमाने वाढवली आहेत. तर  ७३२ नवी उड्डाणे सुरू झाली. प्रवाशांच्या संख्येत दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली. त्यामुळे कंपन्यांची संचालन खर्च कमी झाला. भाड्यातून मिळणारे उत्पन्न वाढले. त्याचा थेट परिणाम प्रवास भाड्यावर झाला आहे. उड्डयन मंत्रालयानुसार, गेल्या काही वर्षांत विमानांचे सरासरी भाडे १८ टक्क्यांनी कमी झाले आहे.

 

५ वर्षांत आता १०% जागा अधिक भरत आहेत

विमाने, प्रवासी, उड्डाणांची संख्या सतत वाढत आहे. पाच वर्षांत प्रवासी भार ९.८% वाढला आहे. गेल्या पाच वर्षांत देशात विमानांच्या जागांच्या संख्येत ४.७८ कोटींची वाढ झाली. प्रवाशांची संख्याही चार कोटींवर वाढली. पाच वर्षांत उड्डाण संख्येत २,६७, २१७ एवढी वाढ झाली. २०१२-१३ मध्ये ५,३६,५७९ वेळा विमान उड्डाणे झाली. २०१६-१७ मध्ये ही संख्या वाढून ८,०३,७९६ झाली. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, देशात एक वर्षात दोन कोटी जागा वाढल्या, प्रथमच एवढी वाढ...

बातम्या आणखी आहेत...