आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1984: एवढ्या भीषण होत्या शीखविरोधी दंगली; राजीव गांधींनी अशी दिली होती प्रतिक्रिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - 1984 शीखविरोधी दंगलींच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने नव्याने एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. न्या. केपीएस राधाशरण आणि जस्टिस न्या. पांचाल यांच्या पर्यवेक्षीय समितीने याआधीच्या एसआयटीने केलेल्या तपासावर सुप्रीम कोर्टाला आपला अहवाल सोपवला आहे.

 

याप्रकरणी सुप्रीम  कोर्टाने तीन सदस्यीय एसआयटीमध्ये हायकोर्टाचे निवृत्त जज, एक निवृत्त आयपीएस अधिकारी आणि एक कार्यरत आयपीएस अधिकारी यांना सामील करण्याचे आदेश दिले आहेत. ही एसआयटी बंद केलेल्या 186 खटल्यांची पुन्हा चौकशी करून आपला अहवाल देणार आहे. यानंतर हे खटले पुन्हा सुरू केले जाऊ शकतात.

 

अशा घडल्या 1984 च्या शीखविरोधी दंगली
भारतीय शिखांविरुद्धच्या या दंगलींचे कारण होते इंदिरा गांधींची त्यांच्याच अंगरक्षकांकडून झालेली हत्या. हे अंगरक्षक शीख होते. या हत्येच्या प्रत्युत्तरात या सर्व दंगली झाल्या. या दंगलींमध्ये 3000 हून अधिक जणांचे मृत्यू झाले. सीबीआयच्या मते, या सर्व हिंसक घटना दिल्ली पोलिसांतील अधिकारी आणि इंदिरा गांधींचे पुत्र राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या सहमतीने आयोजित करण्यात आले होते.  

 

राजीव गांधींनी दिली होती अशी प्रतिक्रिया.. 

राजीव गांधी ज्यांनी आपल्या आईच्या निधनानंतर पंतप्रधानाच्या रूपात शपथ घेतली त्यांना या दंगलींबाबत विचारल्यावर ते म्हणाले होते, "जब एक बड़ा पेड़ गिरता है, तब पृथ्वी भी हिलती है"।

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, किती भीतिदायक होते या दंगलींचे दृश्य, 3000 हून जणांचे गेले होते प्राण...

बातम्या आणखी आहेत...