आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुणाला प्रेमसंबंध असे पडले महागात, आईसमारेच चिरला एकुलत्या एक मुलाचा गळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - एका विशिष्ट समुदायाच्या तरुणीशी प्रेमप्रकरणामुळे मुलाचा जीव गेला. तरुणीच्या कुटुंबीयांनी गुरुवारी रात्री ख्याला रोडवर 23 वर्षीय अंकितवर हल्ला केला. यादरम्यान आरोपींनी अंकितचा भररस्त्यात निर्घृणपणे गळा चिरून खून केला. खुनाच्या वेळी चहुबाजूंनी लोकांची गर्दी जमलेली होती. अंकित लोकांना मदत मागत होता, परंतु कोणीही पुढे आले नाही. मुलाला वाचवायला गेलेल्या आईलाही आरोपींनी बेदम मारहाण केली. यानंतर गर्दीतून आरोपी पसार झाले. घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत अंकितला त्याच्या आईवडिलांनी रुग्णालयात नेले, परंतु तेथे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. 

- घटनेनंतर पूर्ण परिसर सध्या छावणीत बदलला आहे. फक्त दिल्ली पोलिसच नाही, तर निमलष्करी दलालाही घटनास्थळ आणि आसपास तैनात करण्यात आले आहे.
- पोलिसांनी कुटुंबीयांच्या जबाबावरून गुन्हा दाखल करून 3 आरोपींना तसेच तरुणीच्या अल्पवयीन भावालाही ताब्यात घेतले आहे.

 

दोन दिवसांपासून गायब होती तरुणी, तरुणावर केला आरोप
- गुरुवारी संध्याकाळी तरुणीचे आई-वडील, मामा आणि छोटा भाऊ अंकितच्या घरी पोहोचले आणि त्याच्या आईवडिलांशी वाद घालू लागले.
- तरुणीच्या कुटुंबीयांनी आरोप केला की, त्यांची मुलगी मागच्या दोन दिवसांपासून घरातून गायब आहे आणि यासाठी सर्वस्वी अंकितच जबाबदार आहे.
- त्यांनी अंकितच्या आईवडिलांना मारहाण केली आणि धमकी देऊन तिथून निघून गेले.

 

तरुणी आली समोर, म्हणाली- माझीही होऊ शकते हत्या...
- अंकितच्या खुनाची माहिती मिळताच प्रेयसी स्वत:हून पुढे आली. तिने पोलिसांसमोर पूर्ण घटना पूर्वनियोजित असल्याचे सांगत स्वत:चीही हत्या होण्याची भीती व्यक्त केली.
- पोलिस अधिकारी म्हणाले, तरुणीने पोलिसांना सांगितले की, ती गुरुवारी आपल्या घरात होती आणि अंकितला भेटण्यासाठी जात होती. 
- याची माहिती कुटुंबीयांना मिळाली होती. त्यांनी तिला अंकितला भेटायला विरोध केला आणि घरात बंद केले. यानंतर सर्वजण रागातच घराबाहेर गेले होते.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, प्रकरणाचे आणखी फोटोज...

बातम्या आणखी आहेत...