आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुलंदशहरमधून दाऊदचे 3 पंटर अटकेत, शिया वक्फ बोर्ड अध्यक्षांच्या हत्येचा होता कट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधून दाऊद इब्राहीमच्या तीन पंटरना अटक केली आहे.  पोलिसांच्या मते, शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी या सर्वांना अटक करण्यात आलेली आहे. रिझवी यांनी जानेवारीमध्ये त्यांना फोनवर दाऊदकडून मारण्याची धमकी मिळाल्याची तक्रार दाखल केली होती. 


तिघे होते दाऊदच्या संपर्कात 
- न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार दिल्ली पोलिसांना बुलंदशहरमध्ये दाऊच्या टोळीतील काही सदस्य काहीतरी कट रचत असल्याची माहिती मिळाली होती. 
- पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत छापा मारला होता. त्यात आरिफ, अबरार आणि सलीमला अटक करण्यात आली होती. 
- असेही सांगितले जाते की, हे तिघेही दाऊदच्या संपर्कात होते. 


दाऊदकडून धमकी मिळाल्याची दिली होती तक्रार 
- जानेवारीमध्ये वसीम रिझवी यांनी फोनवर त्यांना दाऊदकजडून मारण्याची धमकी मिळाल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर त्यांनी दाऊद इब्राहीमच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्यानंतर त्यांची सुरक्षाही वाढवली होती. 
- रिझवी यांनी तक्रारीत सांगितले होते की, त्यांना फोनवर धमकी देणाऱ्याने तो डी कंपनीचा असल्याचे सांगितले होते. 


कोण आहे वसीम रिझवी?
- वसीम रिझवी शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष आहेत. अयोध्येत वादग्रस्त जागेवर राम मंदिर बनवण्याच्य बाजुने ते आहेत. 
- त्यांनी अयोध्येत मंदिर आणि लखनऊमध्ये मस्जिद-ए-अमन तयार करण्याचा प्रस्तावही ठेवला होता. 
- रिझवी यांनी काही दिवसांपूर्वी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाला एक लिस्टही पाठवली होती. त्यात काही मशिदींची नावे होती. रिझवी यांचा दावा होता की, या मशिदी मोगलकाळात मंदिरे तोडून तयार करण्यात आल्या आहेत. त्या हिंदुंना सोपवाव्यात असे ते म्हणाले होते. 

 

 

बातम्या आणखी आहेत...