आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराकमध्ये 4 वर्षांपूर्वी अपहृत 39 भारतीयांचे अवशेष मिळाले, इसिसने केली होती सर्वांची हत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - इराकच्या माेसूलमध्ये ४ वर्षांपूर्वी अपहृत ३९ भारतीयांची इसिसच्या अतिरेक्यांकडून हत्या झालेली आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी संसदेत ही माहिती दिली. या हत्या कधी झाल्या हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. शरीरांचे अवशेष मोसूलच्या बदूश गावात एका टेकडीवरील सामूहिक कबरींत सापडले.

 

डीएनए चाचणीद्वारे त्यांची ओळख पटली. ३८ अवशेषांचा डीएनए भारतातून पाठवलेल्या नमुन्यांशी जुळला. मृत लोक हे बांधकाम कंपनीत काम करत होते. पैकी २७ पंजाब, ६ हिमाचल, ४ हिमाचल व २ प. बंगालचे आहेत. परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंह अवशेष आणण्यासाठी इराकला जातील. यात ८ ते १० दिवस लागू शकतात.

 


गेल्यावेळी काय म्हणाल्या होत्या सुषमा .. 

- सुषमा म्हणाल्या, मला सभागृहाला महत्त्वाची माहिती द्यायची आहे. जून 2015 मध्ये इराकमध्ये आपल्या 39 भारतीयांना ISIS ने बंदी बनवले होते. 

- गेल्यावेळी 27 जुलै 2017 मध्ये सभागृहात याची चर्चा झाली होती. त्यावेळी बाजवा यांनी प्रश्नोत्तराच्या तासात हा मुद्दा उचलला होता. दुसऱ्या दिवशी मी यावर उत्तर दिले. 
- त्यावेळी मी म्हणाले होते की, जोपर्यंत मला पुरावा मिळणार नाही, तोपर्यंत मी त्यांना मृत घोषित करणार नाही. पुरावे नसताना एखाद्याला मृत घोषित करणे पाप आहे. तसे करणे सरकारसाटी बेजबाबदारपणाचे ठरू शकते. पण जेव्हा केव्हा पुरावे मिळेल तेव्हा संसदेचे अधिवेशन सुरू असेल तर नक्की सभागृहाची परवानगी घेऊन, याबाबत मी माहिती देईल. 
- आज मी ते वचन पाळायला आले आहे. आज माझ्याकडे पुरावे आहेत. हे पुरावे म्हणजे हरजित मसीहने सांगितलेली कथा खरी नव्हती. दुसरी माहिती म्हणजे, मनावर दगड ठेवून मला सांगावे लागतेय की, त्या सर्वांना ठार करण्यात आले आहे.

 

केटररच्या हवाल्याने दिली माहिती..
- सुषमा स्वराज म्हणाल्या की, हरजित मसीह यांनी सांगितलेली कथा खरी नव्हती. मोसूलमध्ये बेपत्ता झालेले सर्व 39 लोक मारले गेले आहेत. 
- एका केटररने सांगितले की, सर्वांना टेक्सटाइल फॅक्टरीमध्ये नेण्यात आले होते. त्यांनी सांगितले की, बांगलादेशी आणि भारतीयांना वेगळे ठेवण्यात आले. 
- केटररने सांगितले की, हरजितला बांगलादेशचा अली म्हणून बाहेर करण्यात आले. 
- यापूर्वी जेव्हा मी याबाबत सभागृहात बोलले होते, तेव्हा इराकचे परराष्ट्र मंत्री भारतातच होते. 
- इराकमध्ये जेव्हा व्हीके सिंह यांच्यासह भारतीय अधिकारी लोकांना शोधत होते, तेव्हा त्यांनी त्याठिकाणी डीप पेनिट्रेशन रडारची मागणी केली होती. त्यांनी लोकांना जमिनीत पुरले असल्याची माहिती मिळाली होती. 
- भारतीयांची हत्या केल्याचे पुरावेही मिळाले आहेत. डोंगर खोदून मृतदेह बाहेर काढण्यात आले. 
- डीएनए टेस्टमध्ये सर्वात आधी संदीप नावाच्या मुलाची माहिती मिळाली. त्यानंतर कालच इतर 38 जणांचे डीएनए मॅच झाल्याचे आढळले. 
- परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के.सिंह यांनी अत्यंत धैर्याने हे काम पूर्ण केले. ते सर्व अत्यंत कठीण परिस्थितीत राहिले, जमिनीवर झोपले. नंतर मृतदेह बगदादला घेऊन गेले. 

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, भारतीय असे झाले होते बेपत्‍ता...

 

हेही वाचा,

मोसूलमध्‍ये ज्‍यांनी मृतदेह शोधले, त्‍यांच्‍याकडून जाणून घ्‍या या मो‍हिमेविषयी

 

 


 

बातम्या आणखी आहेत...