आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली- मागास जिल्ह्यांच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकप्रतिनिधींना शनिवारी नवा मंत्र दिला. चाळिशी पार केलेल्या अधिकाऱ्यांना कुटुंब व इतर चिंताच अधिक असतात. त्यामुळे काम करण्याची जिद्दच नसते. म्हणून मागास जिल्ह्यांत आता तरुण व उत्साही अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जावी, असे मोदींनी म्हटले आहे.
संसद भवनाच्या केंद्रीय कक्षात शनिवारी दोनदिवसीय ‘राष्ट्रीय लोकप्रतिनिधी संमेलन’ सुरू झाले. या वेळी उद््घाटन समारंभानंतर विधानसभा आणि विधान परिषदेच्या सदस्यांसमोर बोलताना मोदींनी मागास जिल्ह्यांच्या विकासावर भर दिला. देशातील मागास जिल्ह्यांत सुमारे ८० टक्के जिल्हाधिकारी चाळिशी ओलांडलेले होते. यातील अनेक पदोन्नतीवर आलेले होते. या वयात कुटुंबाच्या आणि इतर चिंता या अधिकाऱ्यांना असतात. त्यामुळे कामाची जिद्दच राहत नाही, असे मोदी म्हणाले. ते म्हणाले, लोकप्रतिनिधींनी सत्तेत असो अथवा सत्तेबाहेर, केवळ जनतेसाठीच काम करायला हवे. त्यांचे प्रश्न सोडवायला हवेत. दरम्यान, हे संमेलन आयोजित केल्याबद्दल मोदींनी लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांचा गौरव केला.
मागास जिल्ह्यांत बदली झाली की कुठे आणून टाकले, अशी भावना होते...
साधारणपणे जिल्हाधिकाऱ्यांचे सरासरी वय काढले तर २८-३० असते. मात्र, मागास जिल्ह्यात नेमताना अधिक वयाच्या अधिकाऱ्याला नेमले जाते. अशा जिल्ह्यांत बदली झाली की ‘कुठे नेऊन टाकले...’ अशी अधिकाऱ्यांची भावना होते. ही मानसिकताच मागास जिल्ह्यांच्या समस्येचे मूळ आहे.
नक्षलप्रभावित जिल्ह्यांवर भर
देशात एकूण ११५ मागास जिल्ह्यांपैकी ३० ते ३५ जिल्हे नक्षलवादी कारवायांनी प्रभावित आहेत. या जिल्ह्यांचा विकास झाला तर मनुष्यबळ विकास निर्देशांकात भारताची स्थिती चांगली सुधारेल, असे मोदी म्हणाले. सध्या भारत या यादीत १३ व्या स्थानी आहे.
कट्टर राजकारणाचे दिवस आता संपले
देशभरातून आलेल्या आमदारांसमोर बोलताना मोदी म्हणाले, आता देशात आंदोलने आणि कट्टर राजकारण करण्याचे दिवस संपले आहेत. जनता खूप जागरूक झाली आहे, समाजही आता पुरता बदलला आहे. साधारणपणे २० वर्षांपूर्वी तुम्ही आतापर्यंत किती आंदोलने केली, किती वेळा तुरुंगवास भोगला हे राजकीय कारकीर्द गाजण्याच्या दृष्टीने निकष होते. आता खूप बदल झाला आहे.
‘त्या’ ठिकाणची कारणे शोधा
देशातील एकूण ११५ मागास जिल्ह्यांतील विकास का थांबला, याची कारणे शोधण्याची गरज प्रतिपादित करून मोदी म्हणाले, यासाठी निधी किंवा स्रोत वाढवण्याची गरज नाही. जुन्या बजेटमध्येच छोट्या योजना आखून लोकसहभाग वाढवला, सुशासन राबवले तर बदल शक्य आहे.
जुने मापदंड उपयोगाचे नाहीत...
विकासाचे चांगले मॉडेल निर्माण करण्याची गरज प्रतिपादित करून मोदी म्हणाले, काही मागास जिल्ह्यांतील काही जिल्हे असे आहेत की जिथे औद्योगिक विकास खूप झाला, मात्र प्रत्यक्षात ते मागासच राहिले. असाच प्रकार मनरेगा योजनेबाबत आहे. मागास राज्यांत मनरेगाचा अधिक निधी जायला हवा होता तो गेला विकसित राज्यांत. हे बदलले पाहिजे.
जुने मापदंड उपयोगाचे नाहीत...
विकासाचे चांगले मॉडेल निर्माण करण्याची गरज प्रतिपादित करून मोदी म्हणाले, काही मागास जिल्ह्यांतील काही जिल्हे असे आहेत की जिथे औद्योगिक विकास खूप झाला, मात्र प्रत्यक्षात ते मागासच राहिले. असाच प्रकार मनरेगा योजनेबाबत आहे. मागास राज्यांत मनरेगाचा अधिक निधी जायला हवा होता तो गेला विकसित राज्यांत. हे बदलले पाहिजे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.