आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

IITमधील 50 माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केला पक्ष, ओबीसींच्या हक्कांसाठी देणार लढा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) या प्रतिष्ठित संस्थेच्या ५० माजी विद्यार्थ्यांच्या एका गटाने नोकरी सोडून देऊन एक राजकीय पक्ष स्थापन केला आहे. हा राजकीय पक्ष अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमाती (एसटी) आणि इतर मागासवर्गीयांच्या (ओबीसी) हक्कांसाठी लढा देणार आहे. या गटाने आपल्या पक्षाचे नाव ‘बहुजन आझाद पार्टी’ असे ठेवले आहे. त्यांना आता निवडणूक आयोगाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. या गटाचे नेते नवीनकुमार आहेत. त्यांनी २०१५ मध्ये आयआयटी दिल्लीतून पदवी घेतली  आहे. 
 

त्यांनी सांगितले की, पक्षासाठी काम करण्यासाठी आम्ही आमची पूर्ण वेळची नोकरी सोडली आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे मंजुरीसाठी अर्ज दिला आहे. सध्या आमचे काम सुरू आहे. २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवण्याचा सध्या तरी आमचा विचार नाही. आम्ही २०२० ची बिहार विधानसभा निवडणूक लढवू आणि त्यानंतरची लोकसभा निवडणूक लढवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. आमचा कोणालाही विरोध नाही.


सोशल मीडियावर प्रचारही सुरू :

या गटात बहुतांश जण एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गातील आहेत. शिक्षण आणि रोजगारात या समुदायांना त्यांचा योग्य वाटा मिळत नाही, अशी त्यांची खंत आहे. त्यांनी तयार केलेल्या पोस्टरवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस आणि एपीजे अब्दुल कलाम यांची छायाचित्रे आहेत. या पक्षाने सोशल मीडियावर प्रचारही सुरू केला आहे.

बातम्या आणखी आहेत...