आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

76% नागरिकांना वाटते बलात्काऱ्यांना फाशी व्हावी, 85% म्हणाले न्याय 6 महिन्यांत हवा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2013 मध्ये मुंबईमध्ये फोटो जर्नालिस्टच्या रेप आणि हत्या प्रकरणानंतर देशभरात आंदोलन झाले होते. त्यादरम्यान लोकांनी आरोपींना फाशी ठोठावण्याची मागणी केली होती. - फाइल - Divya Marathi
2013 मध्ये मुंबईमध्ये फोटो जर्नालिस्टच्या रेप आणि हत्या प्रकरणानंतर देशभरात आंदोलन झाले होते. त्यादरम्यान लोकांनी आरोपींना फाशी ठोठावण्याची मागणी केली होती. - फाइल
नवी दिल्ली - केंद्र सरकारकडून पॉक्सो अॅक्टमध्ये संशोधनाबाबद जारी करण्यात आलेल्या अध्यादेशाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी मंजुरी दिली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी सोमवारी एका सर्वेक्षणाचे काही तथ्य समोर आले. त्यानुसार 76 टक्के नागरिकांना असे वाटते की, बलात्काऱ्यांना फाशी दिली जावी. लोकल सर्कल्स नावाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने पॉक्सो अॅक्टबाबत लोकांचे मत जाणून घेण्यासाठी 6 सर्वेक्षणे केली. त्यात 40 हजाराहून अधिक लोकांनी वोट केले. 
 
 
पहिले सर्वेक्षण 
न्यूज एजन्सीच्या मते, लोकल सर्कल्सच्या पहिल्या सर्वेक्षणात 76 टक्के लोकांनी बलात्काऱ्यांना फाशी देण्याच्या बाजुने आणि 18 टक्के लोकांनी विना पॅरोल जन्मठेप देण्याच्या बाजुने वोटिंग केले. 3 टक्के लोक म्हणाले की त्यांना 7 वर्षांची शिक्षा दिली जावी. 
 
 
दुसरे सर्वेक्षण 
या सर्वेक्षणात 89 टक्के लोक म्हणाले की, त्यांच्या मते राज्यांमध्ये बलात्काराच्या आरोपींना 6 महिन्यांमध्ये फाशीची शिक्षा देण्याचा कायदा तयार केला जावा. 
 
पुढे वाचा, इतर सर्वेक्षणातून समोर आलेले मुद्दे...
 
बातम्या आणखी आहेत...