आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरबीआयच्या सर्व्हेत 78 % लोक म्हणाले, आगामी वर्षात महागाई वाढणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आगामी एका वर्षात महागाई वाढणार असल्याचे देशातील ७८% लोकांना वाटते. तर केवळ ५.५% लोकांना एका वर्षात महागाई कमी होण्याची आशा आहे. १६.५% लोक मात्र महागाईत काही फरक पडणार नाही या मताचे आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) केलेल्या ग्राहक आत्मविश्वास सर्वेक्षणातून वरील निष्कर्ष निघाला आहे. 


आरबीआयने मे महिन्यात ६ मेट्रो शहरात म्हणजेच दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता आणि हैदराबाद शहरात हे सर्वेक्षण केले होते. अहवाल मात्र आता प्रसिद्ध करण्यात आला आहे. सर्वेक्षणात रोजगार, महागाई, उत्पन्न आणि खर्च या चार निष्कर्षांवर लोकांचे मत जाणून घेण्यात आले. वर्तमान आणि भविष्यातील स्थितीवर लोकांना विविध प्रश्न विचारण्यात आले होते. 

 

1. उत्पन्न
एका वर्षात उत्पन्न वाढेल असे सर्वेक्षणात सामील 50.8% लोकांना वाटते. 38.9% लोकांना मात्र अशी आशा नाही. तर 10.3% लोकांच्या मते, एका वर्षात उत्पन्न कमी होऊ शकते.

 

2. खर्च
पुढील एका वर्षात खर्चात वाढ होईल, असे 84.8% लोकांनी म्हटले. 12.8% लोकांना खर्चात फरक पडणार नसल्याचे वाटते, तर फक्त 2.4% लोकांना खर्च कमी होण्याची आशा आहे. 

 

3. राेजगार
49.5% लोकांच्या मते एका वर्षात रोजगार उपलब्ध होईल. 25% लोकांना रोजगाराची स्थिती वाटते. 25.5% लोकांनी रोजगाराच्या स्थितीत फरक पडणार नसल्याचे म्हटले.

 

4. आर्थिक स्थिती
पुढील वर्षीपर्यंत सर्वसाधारण आर्थिक स्थिती चांगली होईल, असे 49.5% लोकांनी म्हटले, तर 22.7% लोकांना आर्थिक स्थितीत बदल होईल बिलकुलही वाटत नाही.  

 

  पुढील स्लाईडवर पहा उत्पन्न, खर्च, रोजगार आणि आर्थिक स्थितीवर जनतेचे मत... 

बातम्या आणखी आहेत...