आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केरळ : निपाह व्हायरस; अकरा जणांचा मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोझिकाेड - केरळच्या कोझिकोडमध्ये निपाह व्हायरसमुळे (एनआयव्ही) संक्रमण झाल्याने ११ जणांचा मृत्यू झाला. सहा जणांची प्रकृती गंभीर आहे, तर २५ जणांना निगराणीखाली ठेवण्यात आले. जनावरांपासून पसरणारा हा व्हायरस कोझिकोडमध्ये वटवाघळामार्फत पसरला. फ्रूट बॅट म्हटले जाणारे वटवाघूळ प्रामुख्याने फळ किंवा फळांच्या रसाचे सेवन करते.  निपाहमुळे मृत्यूची माहिती मिळताच अतिदक्षतेचा इशारा िदला. रुग्णालयाने व्हायरसमुळे संक्रमित झालेल्या रुग्णावर उपचार करण्यास नकार देऊ नये, असे निर्देश मुख्यमंत्री पी. विजयन यांनी दिले.
 

केरळच्या कोझिकोडमध्ये निपाह व्हायरसमुळे (एनआयव्ही) संक्रमण झाल्याने ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या जीवघेण्या व्हायरसमुळे पीडित सहा जणांची प्रकृती गंभीर आहे, तर २५ जणांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. जनावरांपासून पसरणारा हा व्हायरस कोझिकोडमध्ये वटवाघळामार्फत पसरला आहे. फ्रूट बॅट म्हटले जाणारे वटवाघूळ प्रामुख्याने फळ किंवा फळांच्या रसाचे सेवन करते. 

 

निपाहमुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळताच संपूर्ण केरळमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. कोणत्याही रुग्णालयाने निपाह व्हायरसमुळे संक्रमित झालेल्या रुग्णावर उपचार करण्यास नकार देऊ नये, असे निर्देश मुख्यमंत्री पी. विजयन यांनी दिले आहेत. व्हायरस आणखी पसरू नये यासाठी तसेच विविध विभागांत समन्वय राखण्यासाठी राज्याचे आरोग्य आणि कामगारमंत्री कोझिकोडमध्ये तळ ठोकून बसले आहेत. दोन नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी डॉक्टरांचे एक उच्चस्तरीय पथक केरळला पाठवले आहे.  


अशी आहेत लक्षणे  

श्वास घेण्यास अडचण, तीव्र ताप, जळजळ, डोकेदुखी, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे आहेत. डॉक्टरांनी सांगितले की, हा व्हायरस खूप वेगाने परिणाम करतो. रुग्णाला त्वरित उपचार मिळाले नाहीत तर तो ४८ तासांच्या आत कोमात जाऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, या व्हायरसवर सध्या तरी कुठलीही लस विकसित झालेली नाही. उपचार म्हणून रुग्णांना इंटेन्सिव्ह सपोर्टिव्ह केअरच दिली जाते.  

 

असा पसरतो निपाह व्हायरस  

फ्रूट बॅट किंवा डुक्कर यांसारखे प्राणी त्याचे वाहक आहेत. संक्रमित प्राण्यांच्या थेट संपर्कात आल्यास किंवा त्यांच्या संपर्कात आलेल्या वस्तूंचे सेवन केल्यास निपाह व्हायरसचे संक्रमण होते. निपाह व्हायरसमुळे संक्रमित माणसेही संक्रमण पुढे नेतात.  

 

 

 

मलेशियातून सर्वात आधी ओळख पटली

* एनआयव्ही व्हायरसची ओळख सर्वात आधी मलेशियाच्या कामपुंग सुंगाई निपाहमुळे झाली होती. त्या वेळी त्याचे डुकरांपासून संक्रमण झाले होते.
* २००१ मध्ये पश्चिम बंगालच्या सिलिगुडीतही या व्हायरसचे संक्रमण झाले होते. त्या वेळी समोर आलेल्या ६२ प्रकरणांपैकी ४५ जणांचा मृत्यू झाला होता.
* २००४ मध्ये फ्रुट बॅटद्वारे संक्रमित झालेले खजूर खाल्ल्यामुळे बांगलादेशातही लोक या आजाराच्या विळख्यात सापडले होते.
* २००७ मध्ये पश्चिम बंगालच्या नदियामध्येही पाच जणांचा मृत्यू झाला होता.

 

 

 

बातम्या आणखी आहेत...