आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

8 राज्यांच्या 9 प्रादेशिक पक्षांचा तीन तलाकविरोधी विधेकाला विरोध, कारण 474 मुस्लिम बहुल मतदारसंघ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तीन तलाक थांबवण्यासाठी लोकसभेत बिल पास करण्यात आले आहे. - Divya Marathi
तीन तलाक थांबवण्यासाठी लोकसभेत बिल पास करण्यात आले आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने गुरुवारी तीन तलाक थांबवण्याच्या उद्देशाने एक विधेयक लोकसभेत सादर केले. हे विधेयक लोकसभेत मंजूरही करण्यात आले आहे. पण चर्चेदरम्यान 8 राज्यांच्या 9 प्रादेशिक पक्षांनी या विधेयकाला किंवा त्यातील तरतुदींना विरोध केला. त्याचे कारण या राज्यांमधील मुस्लीम बहुल मतदारसंघ हे आहे. या 8 राज्यांमध्ये 474 मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघ आहेत. 


विरोधकांनी केला तरतुदींना विरोध 
- तेलंगणाच्या हैदराबादमधून एमआयएमच्या खासदारपदी निवडून आलेल्या असदुद्दीन ओवेसींनी म्हटले की, हे विधेयक मुलभूत अधिकारांचे (फंडामेंटल राइट्स) हनन करते. 
- बिहारच्या आरजेडी आणि ओडिशाच्या बीजू जनता दलानेही विरोध केला. केरळमधील मुस्लीम ली, पश्चिम बंगालमधील तृणमूल कांग्रेस आणि सीपीएमनेही विरोध केला. 
- महाराष्ट्रातून एनसीपी, युपीतील सपा आणि तमिळनाडूच्या एआयएडीएमकेनेही विधेयकातील कमतरता मोजून दाखवल्या आणि विधेयक स्थायी समितीकडे पाठवण्याची मागणी केली. तर एनडीएतील शिवसेना, तेलगू देसम पार्टी आणि अकाली दल अशा पक्षांनी पाठिंबा दिला आहे. 

 

8 राज्यांत असे आहे मुस्लीम जागांचे समीकरण 

राज्य एकूण जागा मुस्लीम आमदार  मुस्लीमबहुल मतदारसंघ
युपी 403 25 124
प. बंगाल 294 59 100
केरळ 140 29 40
बिहार 243 24 80
तमिळनाडू 235 05 40
महाराष्ट्र 288 10 50
तेलंगणा 119 09 30
ओडिशा 147 03 10

 

8 राज्यांतील मुस्लीम वोट बँक

राज्य मुस्लीम मतदार हिंदू मतदार
प. बंगाल 27.01% 70.54%
युपी 19.26% 79.73%
ओडिशा 2.17% 93.63%
बिहार 16.87% 82.69%
केरळ 26.56% 54.73%
तमिळनाडू 5.86% 87.58%
महाराष्ट्र 11.54 % 79.83%
तेलंगणा 12% 86%

 

मुस्लीमबहुल 218 जागांवर नजर 

- देशात 145 लोकसभा जागांवर 11 ते 20% मुस्लिम मतदार आहेत. 38 जागांवर मुस्लिम मतदार 21 ते 30% आहे. 35 जागांवर 30% ते त्यापेक्षा अधिक मतदार आहेत. तीन तलाक कायदा बनल्याने या जागांवर भाजपला 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मुस्लीम महिलांची मते मिळू शकतात. 
- 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीबरोबरच किंवा आधी 13 राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. त्याठिकाणी 130 विधानसभा मतदारसंघ  मुस्लीमबहुल आहेत. एकट्या कर्नाटकात 40 मुस्लिम बहुल मतदारसंघ आहेत. त्याठिकाणी 2018 च्या सुरुवातीलाच विधानसभा निवडणुका होणार आहेत. 2018 मध्ये इतर 7 राज्यांतही निवडणुका आहेत. 


2008 मध्ये होते 31 मुस्लिम खासदार 
- 2014 मध्ये लोकसभेत 22 मुस्लिम खासदार निवडून आले होते. 2009 मध्ये मुस्लीम खासदारांची संख्या 31 होती. 
- सध्या सर्वाधिक 7 मुस्लीम खासदार पश्चिम बंगालमधून आहेत. बिहारमधील 4, जम्मू-काश्मीर आणि केरळमधील प्रत्येकी 3 खासदार मुस्लीम आहेत. आसाममधील 2 मुस्लीम खासदार आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...