आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीच्या शाळेत नववीच्या विद्यार्थ्याची मारून-मारून हत्या, वर्गातील 3 विद्यार्थ्यांना अटक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नॉर्थ-ईस्ट दिल्लीच्या एका खासगी शाळेमधील एका 16 वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांनी त्याच्या तीन मित्रांना अटक केली आहे. पोलिसांच्या मते सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. एकाच्या शोधासाठी पोलिस पथके पाठवली आहेत. शुक्रवारी पोलिसांना जे सीसीटीव्ही फुटेज मिळाले त्यात 4 मुले बाथरूममध्ये मृत मुलाला लाथा बुक्क्यांनी मारत असल्याचे आढळून आले होते. आरोपींच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


केव्हा घडली होती घटना 
- न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार करावल नगरच्या जीवन ज्योती स्कूलच्या बाथरूममध्ये नववीचा विद्यार्थी तुषार (16 वर्षे) गुरुवारी संशयास्पद अवस्थेत आढळला होता. त्यानंतर त्याला जीटीबी रुग्णालयात नेण्यात आले. त्याठिकाणी उपचारादरम्यान तुषारचा मृत्यू झाला होता. 
- घटनेनंतर शाळा व्यवस्थापनाने म्हटले होते की, तुषार डायरियाने ग्रस्त होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक तपासामध्ये पोलिसांनाही त्याच्या शरिरावर मारहाणीच्या काहीही खुणा आढळल्या नव्हत्या. 


सीसीटीव्ही फुटेज आले समोर 
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यात तुषार आणि इतर काही मुले बाथरूममध्ये भांडण करत असल्याचे दिसत आहे. त्याच्या आधारे तीन मुलांना अटक करण्यात आली आहे. त्यांचा एक मित्र फरार आहे. 
- डीसीपी अजित सिंगला यांनी सांगितले की, सीसीटीव्हीच्या तपासानंतर हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यात असे दिसून येत आहे की, तुषारचे 4 मुलांबरोबर भांडण झाले होते. जेव्हा तो बाथरूममध्ये पडला तेव्हा त्या सर्वांनी त्याला लाथा बुक्क्यांनी मारले आणि अखेर त्याचा मृत्यू झाला होता. 


तुषारच्या कुटुंबाचा आरोप.. 
मॉत विद्यार्थी तुषारच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, शाळेच्या बाथरूममध्ये काही मुलांनी त्याच्याबरोबर मारहाण केली. कुटुंबाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मेडिकल बोर्ड शुक्रवारी पोर्टमॉर्टम करणार आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...