आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Buradi Case Bought Stool A Few Hours Before Death And Children Brought To The Wire

Buradi Death Mystery: सीसीटीव्हीत दिसले- घरातील 2 महिलांनी फाशीसाठी स्टूल खरेदी केले, मुलांनी आणली तार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
> 11 जणांच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी सामूहिक आत्महत्येपर्यंत येऊन ठेपली आहे.
> सीसीटीव्हीमध्ये ललितही डॉक्टर टेप घेताना दिसला.

 

नवी दिल्ली - बुराडीच्या संतनगरमध्ये एकाच कुटुंबातील 11 जणांच्या मृत्यूप्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. आता एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. यात कुटुंबातील काही सदस्य 30 जून रोजी रात्री 10 वाजता स्टूल खरेदी करताना दिसत आहेत. डीसीपी जॉय एन. टिर्की म्हणाले की, या फुटेजमध्ये कुटुंबातील सदस्य भुवनेशची पत्नी सविता आणि ललितची पत्नी दिसत आहेत. याच्या काळी वेळानंतर त्यांची मुले विजेची तार घरात नेताना दिसत आहेत. फासावर लटकण्यासाठीच अशाच तारेचा वापर करण्यात आला होता.

 

11 जणांच्या मृत्यूचे गूढ

क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी त्यांच्या घराची पुन्हा झडती घेतली. पोलिसांचे मानणे आहे की, ललित आणि टिना या दांपत्याने कुटुंबातील इतर सदस्यांचे हात-पाय बांधले असावेत. मागच्या 2 महिन्यांपर्यंतच्या फुटेजची तपासणी केली जात आहे. यात दांपत्याच्या संदिग्ध हालचाली आढळल्या आहेत. 23 ते 30 जूनदरम्यान ललित व टीना धार्मिक कार्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध वस्तू खरेदी करताना दिसत आहेत. 27 जूनच्या एका फुटेजमध्ये ललित पॉलिथीनमध्ये डॉक्टर टेप आणि काळी वस्तू घेऊन जाताना दिसला. चौकशी केल्यावर कळले की, ललित वा कुटुंबातील कोणताही सदस्य स्वत: कधीच काही सामान घेण्यासाठी जात नव्हते. घरात काम करणारा पप्पूच सामान घेण्यासाठी जायचा. मग ललित स्वत का आणि काय घेऊन जात होता, याची चौकशी केली जात आहे.

 

वैज्ञानिक पुराव्यांना पोलिस बनवणार आत्महत्येचा आधार:
पोलिसांची चौकशी सामूहिक आत्महत्येच्या अँगलवरच पुढे जात आहे. सर्व दुवे जुळवण्यासाठी पोलिस वैज्ञानिक दृष्टिकोनातून पुरावे गोळा करत आहेत. कोर्टात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यासाठी पोलिस पोस्टमॉर्टम, एफएसएल, व्हिसेरा, सायको ऑटोप्सी रिपोर्टला आधार बनवणार आहे. पोलिस सूत्रांनुसार, घटनास्थळी आढळलेल्या नोट्सना मनोचिकित्सक तज्ज्ञाकडे पाठवणार आहेत. क्राइम ब्रँचचे एक अधिकारी म्हणाले की, सध्या या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल आहे. चौकशीत हत्येचे संकेत मिळालेले नाहीत. दुसरीकडे, पोलिसांना घरात कोणत्याही बाबाचे फोटो मिळालेले नाहीत. फक्त 3 रजिस्टर मिळाले आहेत. पोलिसांनी 20 रजिस्टर असल्याची बाब नाकारली आहे.

 

मार्चनंतर मोक्षाबाबत जास्त लिहिल्याचा उल्लेख:
रजिस्टरवरून कळते की, मार्चच्या आधी मोक्ष आणि यज्ञाबाबत जास्त लिहिलेले नाही. मार्चनंतरच मोक्ष, यज्ञाबाबत जास्त लिहिण्यात आले. आता पोलिस जानेवारीपासून घटनेच्या दिवसापर्यंत ललितचे कॉल डिटेल्स तपासत आहेत.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित CCTV  फुटेज व Photos...

 

बातम्या आणखी आहेत...