आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Blade Attack: 7 वीच्या मुलावर वर्गमित्रांकडून हल्ला, लागले 35 टाके; जागेवरून झाला होता वाद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - बदरपूर येथील केंद्रीय विद्यालयात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यावर त्याच्याच वर्गातील मित्रांनी ब्लेडने जिवघणा हल्ला केला. धारदार ब्लेडने तो इतका जखमी झाला की त्याच्या शरीरावर 35 टाके लावावे लागले आहेत. वर्गात कोणत्या जागेवर कुणी बसावे या वादावर हे भांडण झाले आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, त्या विद्यार्थ्याच्या पाठीवर आणि हातावर ब्लेडचे वार आहेत. त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुदैवाने तो धोक्यातून सावरला असून उपचाराला प्रतिसाद देत आहे. 


बाथरुममध्ये नेऊन केला हल्ला
बदरपूर शाळेत 7 व्या वर्गात शिकणारा विद्यार्थी रोजप्रमाणेच आपल्या जागेवर बसला होता. परंतु, आपल्या वर्गमित्रांसोबत जागेवरून त्याचा वाद झाला. हा वाद इतका वाढला की वर्गमित्रांनी त्याला ओढून शाळेच्या बाथरुममध्ये नेले. याच ठिकाणी त्याच्यावर ब्लेडने वार करण्यात आले आहेत. रुग्णालयातून समोर आलेल्या पीडित मुलाचे फोटो आणि व्हिडिओ पाहता त्याच्या पाठीवर मानेपासून कंबरेपर्यंत एक लांब असा ब्लेडचा वार दिसून येतो. पीडित मुलाच्या आईने सांगितल्याप्रमाणे, तिच्या मुलाने वेळोवेळी शाळा प्रशासनाकडे आपल्याला मारहाण होत असल्याची तक्रार केली होती. परंतु, शालेय प्रशासनाने त्यावर दुर्लक्ष केले. शिक्षक आणि प्राचार्यांनी लक्ष लक्ष घातले असते तर हा प्रकार घडलाच नसता.


पुढील स्लाइड्सवर पाहा, फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...