आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

#Burari Death Mystery: भाटिया फॅमिलीचा मृत्यूआधीचा अखेरचा Video, प्रियंकाच्या साखरपुड्यात केला डान्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क/ नवी दिल्ली - बुराडी परिसरात एकाच कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू गूढ ठरला आहे. हे रहस्य सोडवण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. अजूनही हे स्पष्ट झालेले नाही की, हे प्रकरण हत्येचे आहे अथवा आत्महत्येचे. पोलिसांसमोर अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. त्यांची उत्तरे शोधण्यासाठी पोलिस जंग-जंग पछाडत आहेत. दरम्यान, एक व्हिडिओ समोर आला आहे, जो मृतांपैकी एक असलेल्या प्रियंकाच्या साखरपुड्याचा आहे. 

 

15 दिवसांतच असे काय झाले की सर्वांनी घेतला गळफास?

प्रियंकाचा साखरपुडा 17 जून रोजी झाला होता. मग 15 दिवसांतच असे काय झाले की सर्वांनी गळफास घेतला? सूत्रांनुसार, एका बाबालाही पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप त्याला दुजोरा दिलेला नाही. क्राइम ब्रँचलाही गदा बाबा नावाच्या एका बाबाची माहिती मिळाल्याचे वृत्त आहे. पोलिसांच्या चौकशीत 5 फोन नंबरही समोर आले. त्या नंबर्सवर जास्त बोलणे व्हायचे. या नंबर्सचा तपास पोलिस घेत आहेत.


रजिस्टरमध्ये लिहिले होते हे सर्व..
घरात सापडलेल्या रजिस्टरमध्ये वडाच्या पुजेबाबत 37 पाने लिहिलेली आहेत. घरामध्ये मृतदेहदेखिल वडाच्या पारंब्यांसारखेच लटकलेले होते. असेही लिहिले होते की, आम्ही मरत नाही आहोत, परमात्म्याला भेटून आम्ही परत येणार आहोत. सात दिवस सलग पुजा करायची करायची आहे. त्यादरम्यान कोणी घरात आले तर पुन्हा नव्याने पुजा सुरू करायची आहे, असेही लिहिलेले होते. पुजेसाठी गुरुवार किंवा रविवारचा दिवस निवडायचा. विधी रात्री 12 ते 1 दरम्यान करायचा आहे. त्यापूर्वी यज्ञ करायचे आहे. आपले हात स्वतः बांधायचे, विधीनंतर दुसरा कोणीतरी ते हात सोडेल.


सर्वात शेवटी ललित मारला गेला, त्याचे हातही बांधलेले नव्हते
क्राइम ब्रँचनुसार वयस्कर महिलेचे ललित आणि भूपी असे दोन मुले होते. ललितला त्यांचे वडील नेहमी स्वप्ने दाखवायचे. तोच सर्वात जास्त धार्मिक होता. असे समजले जात आहे की, रजिस्टरमध्ये नोट त्यानेच लिहिल्या होत्या. डॉक्टरांच्या मते, सर्वांचा मृत्यू रात्री दोन ते अडीचच्या दरम्यान झाला. सर्वात शेवटी ललित आणि त्याची पत्नी टीनाचा मृत्यू झाला. सर्व 11 मृतांमध्ये त्यांचे दोघांचेच हात खुले होते.


भाऊ म्हणाला, 11 पाइप मीच व्हेंटिलेशनसाठी लावले होते
पोलिसांना घराच्या भिंतीवर प्लास्टीकचे 11 पाइप आणि जाळीत बांधलेले 11 गज सापडले. पाइप घराच्या भिंतीवर लावलेले आहेत. 4 पाइप सरळ आणि 7 वाकडे तिकडे आहेत. मृतही 11 जण होते. त्यामुळे पोलिस याचाही संबंध घटनेशी लावत आहेत. पण कोटाहून आलेला कुटुंबातील मोठा मुलगा दिनेश म्हणाला की, तो सिव्हील कॉन्ट्रॅक्टर आहे आणि त्यानेच व्हेंटिलेशनसाठी हे पाइप लावले होते.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या बुराडी डेथ मिस्ट्रीतील कुटुंबीयांचा अखेरचा व्हिडिओ... 

बातम्या आणखी आहेत...