आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 Questions: दिल्लीत एकाच कुटुंबातील 11 जणांचा मृत्यू; अनुत्तरीत आहेत ही 10 प्रश्ने

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - दिल्लीत एकाच कुटुंबातील 11 जणांचे मृतदेह एकाच घरात सापडल्याने देशभर खळबळ उडाली आहे. फासावर लटकलेल्या प्रत्येकाच्या तोंडावर चिकट टेप होता. त्यांच्या डोळ्यांवर पट्ट्या आणि हात मागच्या दिशेला बांधलेले होते. तर 11 वा मृतदेह एका महिलेचा होता तो फासावर नव्हता. या कुटुंबियांच्या घराखालीच त्यांचे किराणा दुकान होते. घटनेच्या अदल्या रात्री पावणे 12 वाजता त्यांनी ते बंद केले होते. सकाळी एक ग्राहक दुकान बंद पाहून वर घरात गेला तेव्हा तेथील दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच घसरली. अर्थातच दार उघडे होते. अशात हा सामूहिक हत्याकांड आहे की आत्महत्या असा प्रश्न पोलिसांसह सर्वांना पडला आहे. तरीही घटनेचा सविस्तर आढावा घेतल्यास अशी 10 प्रश्ने आहेत जी अजुनही अनुत्तरीत आहेत.


1. जी वृद्ध महिला फासावर लटकलेली नव्हती तिला कुणी आणि का मारले?
2. उर्वरीत 10 लोकांनी आत्महत्या केली असा संशय व्यक्त केला जात आहे. परंतु, त्यांच्या आत्महत्येचे कारण काय असू शकते?
3. घरातील सर्वांनी आत्महत्या केली असेल तर मग घराचे दार उघडे कसे होते?
4. सर्वांनी आत्महत्या केली तर मग सुसाइट नोट का सापडली नाही?
5. लटकलेल्या मृतदेहांपैकी मुला-मुलींच्या मृतदेहांचे पाय जमीनीला स्पर्श करत होते. अशात त्यांना आधी ठार मारून नंतर फासावर लटकवले का?
6. सर्व 11 जणांचा हात बांधलेले होते. मग, त्या सर्वांना फासावर कुणी लटकवले आणि मारले कुणी?
7. घरात कुत्राही पाळलेला होता. मग, बाहेरून येऊन कुणी हे कृत्य केले असेल तर कुत्रा भुंकला का नाही?
8. सर्वांचे मृतदेह एकाच खोलीत अगदी चिटकून लावलेले होते. एका कुटुंबातील हे लोक एकमेकांच्या अगदी बाजूला कसे लटकले असतील?
9. घरात मोठ्या प्रमाणात कॅश होता. तसेच कुठेही लूट झाल्याची चिन्हे दिसली नाहीत. म्हणजे, हे कृत्य जवळच्या माणसाने केले का?
10. मेन गेट आणि घरात प्रवेश करणारे दार सुद्धा उघडेच होते. सर्वांना कथित अघोरी अनुष्ठाण करायचाच होता तर मग त्यांना दार बंद करण्याची गरज वाटली नाही का?


पुढील स्लाइड्सवर पाहा, फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...