आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • प्रियकरावर ब्लॅकमेलिंगचे आरोप Gf Provokes Mob To Thrash Her Lover In Kanpur

BF ला भेटायला बोलावले, जेवणही केले; 5000 उसणे मागताच भडकली GF, लोकांनी केले असे हाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर - येथील कोर्ट कॅम्पसमध्ये एका प्रेयसीने आपल्या प्रियकराला बोलावून वकिलांकडून त्याची धुलाई करून घेतली. लोकांनी प्रियकराला पकडून त्याचे अर्धे केस आणि अर्ध्या मिशा कापल्या. उल्लेखनीय बाब म्हणजे, तिनेच या युवकाला आपल्या घरी बोलावले होते. परंतु, नंतर त्याच्या विरोधात ब्लॅकमेलिंगचे आरोप लावून असे हाल केले. युवकाने सांगितल्याप्रमाणे, त्याला खरोखर 5000 रुपयांची नितांत गरज होती. त्यामुळेच, प्रेयसीकडे ते उसणे मागितले होते. 


असे आहे प्रकरण...
- उन्नाव जिल्ह्यातील माखी गावात राहणारा चांद मोहम्मद आपल्या प्रेयसीची भेट घेण्यासाठी कानपूरला आला होता. गेल्या वर्षभरापासून दोघांचे प्रेम प्रकरण सुरू होते. कानपूरमध्ये राहणाऱ्या प्रेयसिने त्याला फोन करून भेटीसाठी कोर्ट परिसरात बोलावले होते. 
- युवक तिला भेटण्यासाठी कोर्ट परिसरात पोहोचला. परंतु, त्याचवेळी त्या तरुणीने अचानक आरडा-ओरड सुरू केली. हे पाहून वकिलांनी गर्दी केली. तेव्हा हा तरुण आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप तिने लावला. चांदकडे आपली अश्लील क्लिप असून तो इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी देत 1 लाख रुपयांची मागणी करत आहे असा दावा तिने केला. 
- तर दुसरीकडे प्रियकराने आपल्यावर लावलेले आरोप स्पष्टपणे फेटाळले. त्याने सांगितल्याप्रमाणे, त्या दोघांनी एकत्रित बसून जेवण केले. यानंतर त्याने आपल्याला खूप गरज असल्याचे सांगून 5 हजार रुपये उसणे मागितले होते. प्रेयसीने हे पैसे घेऊन येते असे सांगितले. परंतु, यानंतर ती भडकली आणि लोकांची गर्दी करून मला मारहाण करायला लावले. आपण, आधीपासूनच विवाहित असल्याची कबुली चांदने दिली आहे.
- वकिलांनी मीडियाशी संवाद साधताना त्या व्यक्तीच्या विरोधात मुलींना गंडवण्याचे आरोप लावले. घटनेची माहिती मिळताच पोलिस दाखल झाले. तसेच अद्याप कुणाच्याही विरोधात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. प्रथमदृष्ट्या हे प्रकरण खोटे-नाटे दिसून येत आहे. 


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी फोटो आणि व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...