आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नबंधनात अडकली UPSC टॉपर टीना डाबी, 3 वर्षांपासून करत होती IAS अतहरला डेट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - यूपीएससी 2015 ची टॉपर राहिलेली टीना डाबी त्याच एक्झाममध्ये सेकंड टॉपर राहिलेल्या अतहर आमिर उल शफी खानशी विवाहबंधनात अडकली आहे. या दोन्ही IAS अधिकाऱ्यांनी पहलगाममध्ये लग्न केले. टीना दिल्लीची रहिवासी आहे, तर अतहर जम्मू अँड काश्मीरचा रहिवासी आहे. 

 

अशी सुरू झाली दोघांची लव्ह स्टोरी
- टीना आणि अतहरची पहिली भेट डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंगच्या नॉर्थ ब्लॉकमध्ये फेलिसिटेशन फंक्शनमध्ये झाली होती. दोघेही पहिल्या नजरेतच एकमेकांना पसंत करू लागले होते.
- टीना हिंदू आहे आणि अतहर मुस्लिम. या हिंदू-मुस्लिम कपलच्या विरोधात अखिल भारतीय हिंदू महासभेच्या लोकांनी लव्ह जेहाद असल्याचे म्हटले होते, परंतु दोघांनी त्यांच्या धमकीला भीक घातली नाही. 

 

शुक्रवारी पोहोचले होते पहलगाम
- टीना आपल्या पालकांसोबत शुक्रवारी पहलगामला पोहोचली होती. वेडिंग सेरेमनीनंतर टीना आपले पती अतहर यांच्या वडिलोपार्जित गावी- मट्टनला गेल्या.

 

लखनऊशी आहे अतहरचे कनेक्शन
- टीनाने 2015 च्या सिव्हिल सर्व्हिस एक्झाममध्ये टॉप केले होते. असे करणारी ती पहिली दलित तरुणी आहे.
- दुसरीकडे, आमिर जम्मू-कश्मीरमधून आहे. त्याने आयआरटीएसच्या लखनऊमधील ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधून रेल्वे अधिकाऱ्याची ट्रेनिंग घेतली आहे.
- तो डिसेंबरमध्ये येथे ट्रेनिंग करण्यासाठी आला होता आणि येथेच त्याने आपल्या आपल्या साथीदारांसोबत इंटरव्ह्यूची तयारी केली.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, लग्नाचे आणखी फोटोज आणि व्हिडिओ... 

बातम्या आणखी आहेत...