आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video एकतर्फी प्रेमातून तरुणीला भोसकले, रक्ताच्या थारोळ्यात पडलेली तरुणी ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रेटर नोएडा/नवी दिल्ली - एकतर्फी प्रेमातून तरुणाने B.A.च्या तरुणीची चाकूने भोसकून हत्या केली. अभ्यासाबरोबरच ती कॉस्मॅटिक शॉपमध्ये सेल्सगर्लही होती. तरुणीच्या घरी मुलाने बळजबरी लग्नाचा प्रस्तावही पाठवला होता. पण तिच्या कुटुंबीयांनी नकार दिला. 


असे होते प्रकरण.. 
- शुक्रवारी सकाळी 11.45 वाजता आरोपी तरुणीचा पाठलाग करत ती काम करत असलेल्या दुकानावर पोहोचला. त्याठिकाणी त्याने तिच्याशी वाद सुरू केला. शॉपमध्ये गोंधळ नको म्हणून ती पायऱ्यांवर बसून त्याच्याशी बोलत होती. 
- आरोपीने तरुणीवर लग्नासाठी दबाव आणला. नकार दिल्यानंतर त्याने तिच्यावर चाकूने हल्ला केला. मुलीचा आरडा-ओरडा ऐकून आसपासचे लोक आले आणि त्यांनी मुलाला घेरले. पण त्याने स्वतःवरही चाकूने वार करून घेतले. 
- मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पाच मिनिटे तशीच पडून होती. तिला कोणी रुग्णालयातही नेले नाही. लोक अॅम्ब्युलन्सची वाट पाहत राहिले. तोपर्यंत तिच्या शरिरातून मोठ्या प्रमाणावर रक्त वाहिले होते. दोघांना पोलिसांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. त्याचठिकाणी तरुणीचा मृत्यू झाला. 


पोलिसांनी कारवाईत केली टाळाटाळ 

मत तरुणीच्या लहान बहिणीने सांगितले की, कुलदीप वर्षभरापासून तरुणीचा पाठलाग करत होता. त्याची तक्रार पोलिसांत केली होती. पण पोलिसांनी हा विषय गांभीर्याने घेतलाच नाही. त्यामुळे आरोपीचे धाडस वाढले होते. त्याने एकदा घरी येऊनही तिला मागणी घातली होती. पण तरुणीच्या कुटुंबाने त्याला नकार दिला होता. 

 

बातम्या आणखी आहेत...