आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • प्रवाशांच्या जिवाशी खेळ: रेल्वेतील टॉयलेटच्या पाण्याचा चहा Toilet Water Used For Preparing Tea Coffee In Train Contractor Fined 1 Lakh

सिकंदराबाद स्थानकावर उभ्या चारमिनार एक्स्प्रेसमध्ये टॉयलेटच्या पाण्याने चहा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - रेल्वे टॉयलेटच्या पाण्याने चहा-कॉफी तयार केल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एक चहा विक्रेता दोन कॅनसह शौचालयातून बाहेर पडताना दिसतो. व्हिडिओ समोर अाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने विक्रेत्याच्या कंत्राटदारावर १ लाख रुपये दंड ठोठावला. व्हिडिओ गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यातील आहे. सिकंदराबाद स्थानकावर उभ्या चारमिनार एक्स्प्रेसमध्ये व्हिडिओ चित्रित केला आहे.  

 

दक्षिण-मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी एम. उमाशंकर यांच्यानुसार, व्हिडिओ चर्चेत आल्यानंतर रेल्वेने प्रकरणाची चौकशी केली. याआधारे विक्रेत्यास नोकरीवर ठेवणाऱ्या कंत्राटदारावर १ लाख रुपयांचा दंड ठोठावला. दंड कंत्राट देणारी संस्था आयआरसीटीसीद्वारे लावण्यात आला. व्हिडिओ समोर आल्यानंतर रेल्वेच्या व्यावसायिक विभागाने गेल्या काही महिन्यांत सिकंदराबाद रेल्वे स्थानकात बेकायदा विक्रेत्यांना रोखण्यासाठी अभियान सुरू केले. यादरम्यान टॉयलेटमध्ये चहा विकणाऱ्या दोन विक्रेत्यांना काढून टाकले आहे. 

 

दक्षिण-मध्य रेल्वेच्या एका अधिकाऱ्यानुसार, प्रकरण समोर आल्यानंतर पुन्हा घटनेची पुनरावृत्ती होऊ नये,यासाठी रेल्वे कंत्राटदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांवर लक्ष ठेवले जात आहे.  

 

रेल्वेच्या पदार्थांवर प्रश्न उपस्थित होऊ लागले  
याआधी अनेक वेळा खराब पदार्थांच्या तक्रारीवरून रेल्वेवर टीकेचा भडिमार झाला होता. गेल्यावर्षी मार्च महिन्यात राजधानी एक्स्प्रेससारख्या रेल्वेत प्रवाशांनी वाईट पद्धतीच्या जेवणाची तक्रार केली होती. एवढेच नव्हे, तर या वर्षी रेल्वेत दिल्या जाणाऱ्या जेवणाबाबत संसदेत अहवाल सादर केला होता. त्यात रेल्वेतील जेवण माणसांना खाण्यायोग्य नसल्याचे म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...