आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: चोरांनी आधी लावले ठुमके मग केली चोरी, CCTV मध्ये कैद झाली पूर्ण घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीच्या लाहौरी गेटच्या रंगमहलमधील एका गल्लीत काही जण चोरी करायला येतात आणि त्यातील एक चोर मिथुन चक्रवर्तीसारखा डान्स करतो. यानंतर पूर्ण गँग दुकानांमध्ये चोरी करते. ही पूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

 

ही घटना 11 जून रोजी पहाटे 4 वाजताची आहे. सूत्रांनुसार, 5 चोर रंगमहालच्या एका गल्लीत येतात आणि त्यांची एंट्रीच मुळी डान्स करत होते. यानंतर एक चोर मिथुन चक्रवर्तीच्या स्टाइलमध्ये नाचतो, परंतु पुढे आल्यावर तो तोंडावर रुमाल बांधतो. पुढे सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला आहे, हे त्यांना माहिती असते. यानंतर ही गँग आळीपाळीने 5 दुकानांचे शटर तोडते आणि मोबाइल सेट्स, हार्डडिस्क आणि रोख रक्कम घेउुन फरार होऊन जाते.

 

सकाळी जेव्हा दुकान मालक पाहतात की शटर तुटलेले आहेत, तेव्हा ते पोलिसांना याची माहिती देतात. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. अद्याप या चोरांच्या गँगचा कोणताही सुगावा लागलेला नाही. दरम्यान, सीसीटीव्हीपुढे मुद्दामहून नाचणाऱ्या चोरांच्या गँगमुळे परिसरात दहशत पसरली आहे.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, चोरांचे डान्स करतानाचे CCTV फुटेज... 

 

बातम्या आणखी आहेत...