आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्ल्स हॉस्टेलच्या बाथरूममध्ये दिसले असे काही की, पाहताच ओरडायला लागल्या मुली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सामान्यपणे घरामध्ये झुरळ किंवा पालीसारखे प्राणी दिसले तर बरेचजण घाबरत असतात. विशेषतः महिलातर पालींना फारच घाबरत असतात. त्याचे कारण म्हणजे पाल ही दिसायला अत्यंत भयंकर असते. पण विचार करता जर हीच पाल एखाद्या कुत्र्याएवढी असेल तर. पाहा विचार करूनच भिती वाटायला लागली नाही. मग जेव्हा मुलींनी खरंच एवढी मोठी पाल पाहिली असेल तर त्यांची काय अवस्था झाली असेल. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील एका गर्ल्स हॉस्टेलमध्ये अशीच विशालकाय पाल आढळली. तिला पाहून मुलींचा एकच आरडाओरडा सुरू झाला. या पालीला मॉनिटर लिझर्ड म्हटले जाते. 


दिल्लीच्या द्वारका परिसरात असलेल्या नेताजी सुभाष इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये ही पाल आढळली आहे. एका फेसबूक पोस्टमध्ये याबाब माहिती देण्यात आली. या पोस्टमध्ये मुलींना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर रुमचे दरवाजे बंद ठेवण्याच्या आणि जंगलातील रस्त्यांचा वापर टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. 


बेशुद्ध करून नेले...
ही पाल आढळल्यानंतर लगेचच मुलींनी याबाबत माहिती सर्वांना दिली होती. त्यानंतर वनविभागाचे लोक आले आणि त्यांनी बेशुद्ध करून या पालीला हॉस्टेलपासून दूर नेले. कृतिका नावाच्या एका मुलीने हा फोटो काढला आहे. 

बातम्या आणखी आहेत...