आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • A New Step To Pick Up The Government; Students Can Do PhD In Engineering Colleges

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभियांत्रिकी महाविद्यालयांतूनही विद्यार्थी करू शकतील पीएच.डी, लवकरच अधिसूचना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- देशात तंत्रज्ञान विषयांत संशाेधनावरील काम वेगवान करण्यासाठी सरकार नवीन पाऊल उचलत अाहे. त्यानुसार प्रथमच अायअायटी नसलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांतही या शैक्षणिक सत्रापासून पीएच.डी. अभ्यासक्रम सुरू केला जाणार असून, याबाबतची अधिसूचना येत्या काही दिवसांत जारी केली जाईल. 


अातापर्यंत केवळ अायअायटी व एनअायटी संस्थांतूनच संशाेधनासाठी पीएच.डी.चा अभ्यासक्रम पूर्ण केला जात हाेता. या ३ वर्षांच्या पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला दरमहा ३५ हजार रुपये विद्यावेतन दिले जाईल. हा अभ्यासक्रम पूर्णवेळ असेल. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एअायसीटीई) प्रारंभी ५० महाविद्यालयांत पीएचडी.ची तयारी सुरू केली अाहे. त्यासाठी जुलै २०१८पर्यंत प्रवेशप्रक्रिया सुरू हाेईल व सुरुवातीला केवळ १५० जागा ठेवण्यात अाल्या अाहेत. याबाबत परिषदेचे सल्लागार प्रा.दिलीप एन.मालखेडे यांनी अागामी काळात जागा वाढवल्या जाऊ शकतात. तसेच सरकारच्या या निर्णयामुळे तंत्रज्ञान विषयांवरील संशाेधनाचे काम गतिमान हाेईल, असे सांगितले.

 

एम.टेक.मध्ये ७० % गुण अावश्यक

ही परीक्षा सेंट्रलाइज्ड असेल व काेणत्याही मान्यताप्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयातून एम.टेक.मध्ये ७० % वा याहून अधिक गुण परीक्षेसाठी अावश्यक असतील. याशिवाय विद्यार्थ्याने ‘गेट’ वा ‘जी-पॅट’ची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. तसेच त्याचे वय ३० वर्षांपेक्षा कमी असाव. महिला, एससी-एसटी व दिव्यांग विद्यार्थ्यांना वयात ५ वर्षांची सूट दिली जाईल.

बातम्या आणखी आहेत...