आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - मोदींचा एखादा फोटो व्हायरल होण्यात नाविन्य असे काही नाही. मात्र या फोटोमध्ये ते दोन्ही हात जोडून, कमरेत वाकून एका महिलेला नमस्कार करताना दिसत आहेत. हे या फोटोचे वेगळेपण आहे. पंतप्रधान मोदीही ज्यांना झुकून नमस्कार करतात, या महिला आहेत तरी कोण, याची उत्सूकता तुम्हालाही लागली असेल... त्याआधी तुम्हाला सांगितले पाहिजे, की फक्त मोदीच नाही तर दिवंगत माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्यापासून अमिताभ बच्चन सारख्या बड्या हस्तींसोबतही या महिलेचे फोटो आहेत.
चला तर मग जाणून घेऊ कोण आहेत या...
- पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत फोटोत दिसत असलेल्या या महिलेचे नाव आहे दीपिका मॉन्डल. हा फोटो एप्रिल 2015 मधील आहे. तीन वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी आणि दीपिका मॉन्डल समोरासमोर आले तेव्हा टिपलेला हा फोटो आहे.
- दीपिका मॉन्डल या काही सेलिब्रिटी नाही, किंवा राजकीय व्यक्तीमत्व नाही. तर त्या एका एनजीओ - दिव्य ज्योती कल्चरल ऑर्गनायझेशन अँड वेलफेअर सोसायटी (DCOSWS) च्या चीफ फंक्शनरी ऑफिसर आहेत.
- त्यांचे फेसबुक प्रोफाइल तपासले तर लक्षात येते की 2003 पासून त्या या संस्थेत आहेत. प्रीति सेनगुप्ता या संस्थेच्या प्रमोटर आहेत.
काय काम करते एनजीओ?
- indiangolist (इंडिया एनजीओ लिस्ट) या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, दीपिका मॉन्डल चीफ फंक्शनरी ऑफिसर असलेल्या एनजीओचे प्रमुख कार्य हे संस्कृती, शिक्षण, माहिती आणि तंत्रज्ञान, आदिवासींचा विकास यासंबंधी एनजीओ काम करते.
- या एनजीओचे काम दिल्ली, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये चालते.
- यांचा मुख्य उद्देश भारतीय कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देणे आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, रजनीकांत, कमल हासनपासून विद्या बालनसोबत दिसतात दीपिका...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.