आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधार लिंक करण्याची 31 मार्च अखेरची तारीख वाढण्याची शक्यता, केंद्रने सुप्रीम कोर्टाला सांगितले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - केंद्र सरकारने मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की वेगवेगळ्या सर्व्हिसेस आणि वेलफेअर स्किम्सला आधार लिंक करण्याची 31 मार्च ही अखेरची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण अजून प्रलंबित असल्याने ही तारीख पुढे ढकलली जाण्याची शक्यता केंद्राने वर्तवली आहे. 

 

कोणत्या पीठासमोर सुरु आहे सुनावणी
- आधारशी संबंधीत प्रकरणांची सुप्रीम कोर्टाच्या संविधान पीठासमोर सुनावणी सुरु आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा हे पीठाचे अध्यक्ष आहेत. या बेंचमध्ये जस्टिस ए.के. सीकरी, जस्टिस ए.एम. खानविलकर, जस्टिस डी.वाय. चंद्रचुड आणि जस्टिस अशोक भूषण यांचा समावेश आहे. 

 

प्रकरण सुप्रीम कोर्टात का? 
- आधरला अनिवार्य केले जात आहे त्याला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल आहेत. या याचिकांमध्ये आधारच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...