आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • मोठी बातमी: दिल्ली सरकारचे धरणे: मंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती बिघडली, अधिकाऱ्यांनी दावे खोटे ठरवल्यावर केजरी नरमले AAP Leader Satyendra Jain Admitted In Hospital

दिल्ली सरकारचे मंत्री सत्येंद्र जैन यांची प्रकृती बिघडली, अधिकाऱ्यांनी दावे खोटे ठरवल्यावर केजरी नरमले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोमवारी केजरीवाल आणि त्यांच्या मंत्र्यांच्या धरणे-उपोषणाचा 8वा दिवस.
उपोषणावर असूनही सत्येंद्र जैन यांचे वजन शुक्रवारी 1 
किलो 200 ग्रॅम वाढलेले आढळले होते.

 

नवी दिल्ली - आयएएस अधिकाऱ्यांचे कथित आंदोलन संपवण्याच्या नावावर 8 दिवसांपासून धरणे देत असलेले अरविंद केजरीवाल रविवारी रात्री झुकले. केजरीवाल यांनी ट्विट करून अधिकाऱ्यांना सुरक्षेचा विश्वास दिला. म्हणाले की, ते माझ्या कुटुंबाचाच भाग आहेत. तत्पूर्वी, आयएएस अधिकाऱ्यांच्या असोसिएशनने 7 मुद्द्यांवर आंदोलनाचे दावे खोटे ठरवले होते. याच्या 4 तासानंतरच केजरीवाल नरमले. अधिकाऱ्यांनी याला एक चांगले पाऊल म्हटले आणि असोसिएशनच्या बैठकीत निर्णय होईल असे सांगितले. दुसरीकडे, 12 जूनपासून आंदोलनावर बसलेले आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांची रविवारी रात्री उशिरा प्रकृती बिघडली. त्यांना लोकनायक जयप्रकाश हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांच्या उपोषणावर प्रश्न उपस्थित झाले होते. उपोषणादरम्यान डॉक्टरांची एक टीम दररोज त्यांचे वजन चेक करत होती. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी गुरुवारी संध्याकाळी त्यांचे वजन 80.3 किलोग्रॅम होते. दुसऱ्याच दिवशी दुपारी त्यांचे वजन 81.5 किलोग्रॅम आढळले. म्हणजेच एका दिवसात त्यांचे वजन 1.2 किलोने वाढले होते. भास्करने याबाबत सफदरजंग रुग्णालयातील डॉ. राजेन्द्र शर्मा यांच्याशी चर्चा केली होती. ते म्हणाले होते की, उपोषणावर बसलेल्या कोणाचेही वजन एकतर कमी होऊ शकते किंवा समान राहू शकते. वाढत नाही. मग माणसाने कितीही पाणी प्यावे, वाढत नाही.

केजरीवाल आणि गोपाल राय 11 जून रोजी उपराज्यपाल अनिल बैजल यांना भेटण्यासाठी राजभवनात गेले होते. उपराज्यपालांनी वेळ न दिल्याने दोघेही गेस्ट रूममध्ये धरण्यावर बसले होते. यानंतर मंगळवारी सत्येंद्र जैन आणि बुधवारी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया त्यांच्यासोबतच उपोषणावर बसले होते.

 

केजरीवाल यांचा अधिकाऱ्यांना संदेश, म्हणाले- कामावर परता, तुम्ही आमच्या कुटुंबाचा भाग
अरविंद केजरीवाल यांच्या धरणे आंदोलनाच्या समर्थनार्थ रविवारी आम आदमी पार्टीने प्रधानमंत्री निवासाला घेरावासाठी मोर्चा काढला होता. तथापि, पोलिसांनी त्यांना संसद मार्गावरून पुढे सरकू दिले नाही. केजरीवालांनी ट्विटमध्ये नरेंद्र मोदी यांना हुकूमशहा संबोधले होते. आयएएस असोसिएशन म्हणाले की, दिल्लीत कोणताही अधिकारी आंदोलनावर नाही, आप सरकारने अफवा पसरवली आहे. यानंतर केजरीवालांनी अधिकाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले. शनिवारी रात्री उशिरा त्यांच्या आंदोलनाला चार राज्यांचे मुख्यमंत्री- पी. विजयन, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू आणि एच.डी. कुमारस्वामी यांनी समर्थन केले होते. चौघांनीही याबाबत नरेंद्र मोदींची भेट घेतली होती.

 

दिल्ली सरकारच्या उपराज्यपालांना 3 मागण्या
पहिली- दिल्ली सरकारमध्ये कार्यरत भारतीय प्रशासनिक सेवा (आयएएस) अधिकाऱ्यांचे आंदोलन संपवा. दुसरे- काम रोखणाऱ्या आयएएस अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कार्यवाही केली जावी. तिसरी- रेशन तुमच्या दारी योजनेला मंजूर केले जावे.

केजरीवाल सरकारचा आरोप आहे की, मुख्यमंत्री निवासावर चीफ सेक्रेटरी अंशु प्रकाश यांना कथित मारहाणीच्या वादावरून अधिकार मंत्रिमंडळाच्या बैठकीत सहभागी होत नाहीत. ते आंदोलनावर आहेत आणि सहकार्य करत नाहीत.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, संबंधित आणखी फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...