आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'आप\'च्या या ग्लॅमरस MLA अपात्र ठरण्याची शक्यता, बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाही स्टाइल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलका लांबा यांना केजरी सरकारमध्ये संसदीय सचिवपदी नियुक्ती मिळाली होती. - Divya Marathi
अलका लांबा यांना केजरी सरकारमध्ये संसदीय सचिवपदी नियुक्ती मिळाली होती.

नवी दिल्ली - आम आदमी पार्टीच्या 20 आमदारांवर अपात्रतेची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे. यामध्ये आपचा बहुचर्चित चेहरा असलेल्या आमदार अलका लांबा यांचाही समावेश आहे. दिल्लीत प्रचंड बहुमताने आप विजयी झाल्यानंतर 13 मार्च 2015 रोजी केजरीवाल सरकारने आपल्या 21 आमदारांना संसदीय सचिव पदी नियुक्त केले होते. त्यापैकी एक अलका लांबा आहेत. 

अलका लांबा या आपच्या प्रवक्त्या राहिल्या आहेत. कायम लाइम लाइटमध्ये राहाण्याची त्यांना आवड आहे. त्यासोबतच वाद ओढवून घेण्यातही त्या आघाडीवर असतात. दिल्लीत अंमली पदार्थांविरोधात कारवाई करत त्यांनी दुकानांमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांच्यावर हल्लाही झाला होता. आपच्या 20 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे, त्यापैकीच एक असलेल्या आमदार अलका लांबा यांच्याबद्दल DivyaMarathi.Com सांगत आहे. 

वादांशी जुने नाते... 
- वादांशी अलका लांबा यांचे जुने नाते आहे. त्यांचे लग्न दिल्लीतील लोकेश कपूरसोबत झाले होते. मात्र हे लग्न काही दिवसच टिकले. त्यांना ऋतिक नावाचा एक मुलगा आहे.


काँग्रेसच्या NSUI मधून आल्या राजकारणात
महाविद्यालयीन काळापासून अलका लांबा दिल्लीत चर्चेत होत्या. एकेकाळी काँग्रेसमध्ये त्यांचा मोठा दरारा होता. त्यामुळे चांगले-चांगले नेते त्यांच्या दरबारात हजर राहात होते. लांबा यांची कारकीर्द सुरु झाली ती काँग्रेसची विद्यार्थी संघटना 'एनएसयूआय'मधून. 1995 मध्ये त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या संसद सचिव पदाची निवडणूक लढली होती आणि त्यात विजय मिळवला होता. तेव्हा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सीताराम केसरी होते आणि अलका त्यांच्या गुडबुकमध्ये होत्या.


बेस्ट अॅथलिट आणि बेस्ट लिडर
अलका यांनी दिल्ली विद्यापीठाची निवडणूक जिंकून नाव कमावले होते. त्यांचे शिक्षण दयालसिंह कॉलेजमधून झाले. 1995-96 मध्ये त्या बेस्ट अॅथलिट होत्या. त्याच वर्षी त्यांना दिल्ली विद्यापीठाचा बेस्ट लिडर पुरस्कार मिळाला होता. एका फॅशन शोमध्ये त्यांनी रॅम्पवॉक देखील केला होता.

 

वादांशी जुना संबंध
अलका या स्टाइलीश लिडर म्हणून चर्चेत असतात. त्यांची वकृत्वशैली प्रभावी आहे. काँग्रेसमध्ये असताना त्या महिला आयोगाच्या सदस्य होत्या. तेव्हा गुवाहाटी गँगरेप प्रकरणात त्यांनी पीडित महिलेची ओळख सार्वजनिक केली होती. यामुळे त्या वादग्रस्त ठरल्या होत्या. त्यांचे पतीपासून वेगळे होण्याचे प्रकरणही चर्चेत राहिले होते. त्या 20 वर्षे काँग्रेसमध्ये होत्या मात्र पक्षाने त्यांना तिकीट दिले नव्हते, त्यामुळे त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि आपमध्ये प्रवेश केला. तेव्हा त्यांनी त्यांची प्रतिक्रीया फेसबुकवर शेअर केली होती.

 

अलका लांबा यांचा राजकीय प्रवास
> दिल्ली विद्यापीठातून 1994 मध्ये विद्यार्थी नेता म्हणून सुरुवात. नॅशनल स्टुडंट यूनियन ऑफ इंडिया (NSUI) मध्ये प्रवेश करुन दिल्ली प्रदेशच्या महिला विभागाची जबाबदारी सांभाळली.
> एक वर्षानंतर दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संसद निवडणूक लढवली. पहिल्याच निवडणूकीत मोठ्या बहुमताने विजयी.
> 1997 मध्ये ऑल इंडिया NSUI अध्यक्षपदी निवड. त्यानंतर काँग्रेसच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर नियुक्ती.
> 2002 मध्ये मुख्य राजकीय प्रवाहात आल्या. अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या महासचिवपदी नियुक्ती.
> 2003 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर त्यांनी दिल्लीतील मोतीनगर येथून भाजपचे ज्येष्ठ नेते मदनलाल खुराना यांच्याविरोधात निवडणूक लढवली.
> 2006 मध्ये ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या सदस्यपदी नियुक्ती.
> 2013 मध्ये काँग्रेस सोडून आपमध्ये प्रवेश.

> सध्या दिल्लीतील चांदनी चौक या मतदार संघातून आपच्या आमदार. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, अलका लांबा यांचे फोटोज

बातम्या आणखी आहेत...