आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आप आमदारांची मुख्य सचिवांना मारहाण; सचिव अंशू प्रकाश यांच्या तक्रारीवरून FIR

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्लीतील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. - Divya Marathi
दिल्लीतील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.

नवी दिल्ली- दिल्लीवर अधिकार कुणाचा, या मुद्द्यावरून नायब राज्यपाल आणि अधिकाऱ्यांविरुद्ध केजरीवाल सरकारची सुरू असलेली तोंडी लढाई आता हाणामारीपर्यंत पोहोचली आहे. सोमवारी रात्री मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासमोर दोन आमदारांनी शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप दिल्लीचे मुख्य सचिव अंशू प्रकाश यांनी केला. दरम्यान, पोलिसांनी आमदार अमानतुल्लांसह इतर दोघांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.


मंगळवारी दुपारी या मारहाणीवरून संतापलेल्या सचिवालयातील कर्मचाऱ्यांनी दिल्लीचे पर्यावरण मंत्री इम्रान हुसेन आणि त्यांचे सचिव हिमांशू सिंह यांना घेरले. दरम्यान, अंशू प्रकाश यांना मारहाण झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या पार्श्वभूमीवर सचिवालयातील कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी अहवाल मागवला आहे.


काय आहे प्रकरण
 - अशी माहिती आहे की सोमवारी रात्री मुख्यमंत्री निवासस्थानी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मुख्य सचिवही उपस्थित होते. आरोप आहे की आमदारांनी मुख्य सचिवांना धक्का-बुक्की केली त्यासोबतच अपशब्दांचाही वापर केला. 
 
 दिल्लीतील अधिकाऱ्यांचे 'काम बंद' आंदोलन 
 - दिल्ली अॅडमिनिस्ट्रेटिव्ह सबऑर्डिनेट सर्व्हिसेस (डीएएसएस) अध्यक्ष डीएन सिंह म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना बैठकीसाठी बोलावले होते. यावेळी त्यांना मारहाण झाली. हा हल्ला म्हणजे संबंध अधिकारी वर्गावर हल्ला आहे. अशा परिस्थितीत सामान्य कर्मचारी काम कसा करेल.'
 
- सिंह म्हणाले, 'आमची मागणी आहे की जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत एकही कर्मचारी कामावर परतणार नाही. आम्ही ऑफिसमध्ये येऊ मात्र काम करणार नाही.' 
 

आप नेते काय म्हणाले? 
- वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पार्टीने म्हटले आहे, की दिल्लीमध्ये आधारच्या घोटाळ्यामुळे अडीच लाख कुटुंबांना रेशनवर धान्य मिळू शकले नाही. यामुळे आमदारांकडे जनतेच्या अनेक तक्रारी येत होत्या. यासाठीच मुख्यमंत्री निवसास्थानी  बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 
- बैठकीत मुख्य सचिवांना आमदारांच्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. ते म्हणाले मी मुख्यमंत्री आणि आमदारांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास बांधील नाही. 

- मुख्य सचिवांचा आमदारांसोबत बोलण्याचा रोख हा चांगला नव्हता. ते काही न बोलताच बैठकीतून निघून गेले. आता नको ते आरोप करत आहेत. 

 

भाजप नेते म्हणाले- गोंधळलेली केजरी सरकार 
- भाजप नेत्यांनी या घटनेवरुन आप सरकारच्या कारभारावर अनेक आरोप केले. केजरीवाल सरकार गोंधळलेली असल्याचे भाजप नेते म्हणाले. 
- भाजप आमदार मानजिंदर सिंग सिरसा म्हणाले, 'दिल्ली सरकार गुंडगिरीवर उतरली आहे. दिल्लीत ना अधिकारी सुरक्षित आहेत ना विधानसभेत आमदार.'
- भाजपचे दिल्ली अध्यक्ष मनोज तिवारी म्हणाले, 'अरविंद केजरीवाल यांच्या आमदारांनी मुख्य सचिवांसोबत गैरवर्तन केले आहे. आम आदमी पार्टी गुंडगिरी करत आहे. याला तुम्ही शहरी नक्षलवादही म्हणू शकता. केजरीवालांनी राजीनामा दिला पाहिजे.'  

बातम्या आणखी आहेत...