आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्य सचिवांसोबत धक्काबुक्की: आप आमदार अमानतुल्ला पोलिसांना शरण, केजरींच्या सल्लागाराची चौकशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमानतुल्ला खान म्हणाले मी काहीच चुकीचे केलेले नाही. (फाइल) - Divya Marathi
अमानतुल्ला खान म्हणाले मी काहीच चुकीचे केलेले नाही. (फाइल)

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्य सचिव अंशु प्रकाश यांच्या श्रीमुखात भडकवल्याप्रकरणी आरोपी आम आदमी पार्टीचे आमदार अमानतुल्ला खान यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आमदार खान हे स्वतः जमियानगर पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले आणि त्यांनी आत्मसमर्पण केले होते. आमदार खान म्हणाले मी काहीही केलेले नाही, त्यामुळे मला कोणतीही भीती नाही. याआधी आणखी एक आरोपी आमदार प्रकाश जारवाल यांना मंगळवारी रात्री त्यांच्या आंबेडकर नगर येथील घरातून पोलिसांनी अटक केली. 

 

केजरीवालांच्या सल्लागारांचीही चौकशी 
- या प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सल्लागार व्ही.के. जैन यांची पोलिसांनी जवळपास 3 तास चौकशी केली. 
- मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची चौकशी करण्याची कोणतीही योजना नसल्याचे नॉर्थ दिल्लीचे अॅडिशनल डीसीपी हरेंद्र सिंह यांनी सांगितले. सिंह म्हणाले, आम्ही जैन यांच्यासोबत बातचीत केली आहे कारण ते घटनास्थळी उपस्थित होते. 
- दुसरीकडे आमदार प्रकाश यांची सिव्हिल लाइन पोलिस स्टेशनमध्ये चौकशी सुरु आहे. 


अमानतुल्ला काय म्हणाले... 
- पोलिस सुत्रांची माहिती आहे की आमदार अमानतुल्ला यांना तीस हजारी कोर्टात हजर केले जाईल. अमानतुल्ला हे पोलिसांना शरण आले तेव्हा म्हणाले, मी काहीही चुक केलेले नाही, त्यामुळे स्वतः पोलिसांसमोर आलो आहे. 

 

हायकोर्टाचा दखल देण्यास नकार
- दिल्ली हायकोर्टाने या प्रकरणात दखल द्यावी अशी याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे. 


काँग्रेसची मागणी - दिल्ली सरकारने माफी मागावी 
- काँग्रेस नेत्यांच्या एका शिष्टमंडळाने दिल्लीच्या नायब राज्यपालांची भेट घेतली. ते म्हणाले, दिल्ली सरकारने माफी मागितली पाहिजे. 

 

काय आहे प्रकरण
- अशी माहिती आहे की सोमवारी रात्री मुख्यमंत्री निवासस्थानी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मुख्य सचिवही उपस्थित होते. आरोप आहे की आमदारांनी मुख्य सचिवांना धक्का-बुक्की केली त्यासोबतच अपशब्दांचाही वापर केला. 

 

आप नेते काय म्हणाले?
- वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पार्टीने म्हटले आहे, की दिल्लीमध्ये आधारच्या घोटाळ्यामुळे अडीच लाख कुटुंबांना रेशनवर धान्य मिळू शकले नाही. यामुळे आमदारांकडे जनतेच्या अनेक तक्रारी येत होत्या. यासाठीच मुख्यमंत्री निवसास्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 
- बैठकीत मुख्य सचिवांना आमदारांच्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. ते म्हणाले मी मुख्यमंत्री आणि आमदारांच्या प्रश्नांना उत्तर देण्यास बांधील नाही.

- मुख्य सचिवांचा आमदारांसोबत बोलण्याचा रोख हा चांगला नव्हता. ते काही न बोलताच बैठकीतून निघून गेले. आता नको ते आरोप करत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...