आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरींच्या कामाने भाजप-काँग्रेस बेचैन, देशात ब्रिटीश शासनापेक्षा वाईट काळ - लाभाच्या पदावर AAP

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ऑफिस ऑफ प्रॉफिट (लाभाचे पद) प्रकरणात आम आदमी पार्टीने भाजप-काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया शनिवारी म्हणाले, 'अरविंद केजरीवाल सरकारच्या कामकाजाने अनेकांची दुकानदारी बंद झाली आहे. भाजप-काँग्रेस बेचैन झाले आहेत. त्यामुळे ते दिल्ली सरकार पाडण्याचे षडयंत्र रचत आहेत.' दुसरीकडे, आप नेते गोपाल राय म्हणाले, सध्याचे देशातील वातावरण ब्रिटीश शासनापेक्षाही वाईट आहे. दुसरीकडे केजरीवाल आणि पार्टीवर नाराज कुमार विश्वास म्हणाले, की आमदारांवर झालेल्या कारवाईने दुःखी आहे. मात्र केजरीवालांनी माझा सल्ला तेव्हा ऐकला नाही. दिल्लीच्या 20 आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस निवडणूक आयोगाने शुक्रवारी राष्ट्रपतींना केली आहे. 


आपच्या कामकाजाने भाजप - काँग्रेस बेचैन 
- उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले, आमच्या आमदारांनी संसदीय सचिव पदावर राहून कोणताही फायदा घेतलेला नाही. आमदारांनी स्वतःचे पैसे खर्च करुन काम केले. एक रुपयांचाही लाभ त्यांनी घेतलेला नाही. 
- आप सरकारने वीज-पाणी यांचे दर वाढू दिलेले नाही. यामुळे अनेकांची दुकानदारी बंद झाली आहे. 

- सिसोदिया म्हणाले, 'आम आदमी पार्टीच्या कामकाजाने सर्वच विरोधक बेचैन झाले आहेत. आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न झाला, आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न झाले. आता सरकार चौथ्या गियरमध्ये (चार वर्षे) आहे, तर काँग्रेस-भाजपचे धाबे दणाणले आहे.'

 

देशात ब्रिटीश शासनापेक्षा वाईट काळ 
- आपचे दिल्ली प्रदेश अध्यक्ष गोपाल राय म्हणाले, निवडणूक आयोगाने राष्ट्रपतींना शिफारस करण्याच्या आधी आपच्या आमदारांचे म्हणणे ऐकून घेतले नाही. ही लोकशाही प्रक्रिया नाही. त्यांना दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आणि दिल्ली सरकार बदलायचे आहे. 
- सिसोदिया म्हणाले, देशातील 11 राज्यांनी आमदारांना संसदीय सचिव केले आहे. मात्र फक्त 'आप'लाच टार्गेट केले जात आहे. निवडणुक आयोगाचे हे दुटप्पी धोरण आहे. कायदा सर्वांसाठी सारखा आहे. मात्र सध्या देशात ब्रिटीशांपेक्षा अधिक वाईट स्थिती आहे. निवडणुकीला सामोरे जाण्यास आम्ही घाबरत नाही. जनतेला आमच्या प्रामाणिकतेवर विश्वास आहे.