आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजस्थानच्या प्रभारी पदावरून कुमार यांना ‘अाप’ने हटवले, राजस्थानात खांदेपालट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आम आदमी पार्टीचे (आप) संस्थापक सदस्य कुमार विश्वास यांची राजस्थानच्या पक्षाच्या प्रभारी पदावरून गच्छंती करण्यात आली. आपकडून बुधवारी ही घोषणा करण्यात आली. या वर्षअखेरपर्यंत राजस्थानात निवडणुका होत आहेत. आपचे नेते आशुतोष यांनी ही घोषणा केली. राष्ट्रीय कोशाध्यक्ष दीपक बाजपेयी यांना नवे प्रभारी म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.  


आपचे संस्थापक सदस्य असलेल्या कुमार विश्वास यांचे आप नेतृत्वासोबतचे संबंध बिघडत चालले आहेत. आशुतोष यांनी सांगितले, कुमार विश्वास यांना राजस्थानकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. यामुळे हा फेरबदल करण्यात आला. पक्ष सर्व ताकदीनिशी राजस्थानात विधानसभा निवडणूक लढवणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

 

अाम आदमी पार्टीचा राजस्थानात तिसरी आघाडी स्थापण्याचा प्रयत्न

राजस्थानात या वर्षअखेरीस विधानसभा निवडणूक होत आहे. आम आदमी पक्षाने भाजपला कडवी लढत देण्यासाठी काँग्रेस व डाव्या पक्षांसह तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.  
आपच्या एका वरिष्ठ नेत्याने वृत्तसंस्थेस सांगितले, डाव्या पक्षांसोबत आप पदाधिकाऱ्यांच्या तीन ते चार बैठका झाल्या आहेत.  ही बोलणी अंतिम टप्प्यात आहेत. या हालचालीस राजस्थान प्रदेशच्या वरिष्ठ नेत्याने दुजोरा दिला. राजस्थानात आप २०० जागा लढवणार आहे. डाव्या पक्षांसोबत २० ते २५ जागांवर बोलणी सुरू आहेत.   
ग्रामीण अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या समस्या निवडणुकीतील प्रमुख मुद्दे असतील. या मुद्द्यावरच निवडणूक प्रचारात जोर देण्यात येणार आहे. तिसऱ्या आघाडीसंदर्भातकाही अपक्ष आमदार व प्रादेशिक पक्षांशी बोलणी सुरू आहेत, असे आपच्या सूत्रांनी सांगितले.

 

बाजपेयींना उमेदवार निवडीचे अधिकार

अापचे संस्थापक सदस्य कुमार विश्वास यांना हटवून आपचे काेशाध्यक्ष दीपक बाजपेयी यांना आपच्या राजस्थान प्रदेश प्रभारी पदी नियुक्ती देण्यात आली. त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली राजस्थानात आम आदमी पार्टी संपूर्ण ताकदीनिशी निवडणुक लढवणार आहे, असे आशुतोष यांनी सांगितले. आपचे राष्ट्रीय कोशाध्यक्ष असलेल्या दीपक बाजपेयी यांना राजस्थानात उमेदवार निवडीसाठी स्वातंत्र्य देण्यात आले आहे. पक्षाच्या निवड समितीकडून या उमेदवारांच्या नावावर अंतीम सहमती देण्यात येईल.

बातम्या आणखी आहेत...