आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्‍लीचा बॉस कोण? निवडून आलेले सरकार की उपराज्‍यपाल, आज सुप्रीम कोर्टाचा निकाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- केंद्र आणि दिल्‍ली सरकारच्‍या अधिकाराच्‍या विवादासंबंधी सुप्रीम कोर्टाचा निकाल आज (बुधवारी) येण्‍याची शक्‍यता आहे. दिल्‍लीचे मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्‍ली हायकोर्टाच्‍या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्‍हान दिले आहे. दिल्‍ली हायकोर्टाने निकाल दिला होता की, उपराज्‍यपाल हेच दिल्‍लीचे प्रशासन प्रमुख असून त्‍यांच्‍या परवानगीशिवाय कोणताही निर्णय घेतला जाऊ शकत नाही. 


सुप्रीम कोर्टात या प्रकरणी सीजेआय दीप‍क मिश्रा यांच्‍या अध्‍यक्षतेखालील 5 न्‍यायाधीशांच्‍या खंडपीठापुढे 2 नोव्‍हेंबर, 2017पासून सुनावणी सुरू आहे. एका सुनावणी दरम्‍यान कोर्टाने म्‍हटले होते की, 'लोकांनी निवडून दिलेल्‍या सरकारकडे काही अधिकार असायला हवेत. त्‍याशिवाय ते समर्थपणे कारभार कसे करू शकतील'. आम आदमी पक्षातर्फे पी. चिदंबरम, गोपाल सुब्रह्मण्यम, राजीव धवन आणि इंदिरा जयसिंह सारख्‍या नामवंत वकीलांनी बाजू मांडली. दुसरीकडे केंद्र आणि उपराज्‍यपालांतर्फे कोर्टात सांगण्‍यात आले की, 'दिल्‍ली हे राज्‍य नाही. त्‍यामुळे उपराज्‍यपालांना विशेष अधिकार देण्‍यात आले आहेत.'  

 

बातम्या आणखी आहेत...