आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Accident On Saturday Fire In Rajastan And Road Accident In Two States Helicopter Crash In Mumbai

शनिवार ठरला \'घात\'वार, देशभरात रस्ते अपघातापासून हेलिकॉप्टर कोसळण्याची दुर्घटना; 20पेक्षा जास्त मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशभरातील विविध अपघातांमध्ये 20 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. - Divya Marathi
देशभरातील विविध अपघातांमध्ये 20 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे.

वर्षाचा दुसरा शनिवार घातवार ठरला आहे. देशातील विविध भागात हेलिकॉप्टर कोसळण्यापासून बोट उलटणे आणि रस्ते अपघात, अशा विविध घटनांमध्ये जवळपास 20 पेक्षा जास्त जणांचा जीव गेला आहे. जयपूरमध्ये घराला लागलेल्या आगीत एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला तर, मुंबईत हेलिकॉप्टर कोसळले यात 2 क्रू मेंबर्ससह 7 जण होते. मुंबईजवळील पालघर येथे बोट उलटून 40 विदयार्थी बेपत्ता झाले होते. यातील 32 जणांचा शोध लागला आहे. सांगलीत क्रुजर-ट्रॅक्टरच्या अपघातात 5 पैलवानांसह सहा जणांना जीव गमवावा लागला.

 

- अपघाताची पहिली बातमी जयपूरमधून आली. पहाटे 4 वाजता घराला आग लागली आणि त्यानंतर घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाला यात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे. 
- दक्षिण भारतातील महत्त्वाचा सण पोंगलला आजपासून सुरुवात झाली आहे. या सणाची सुरुवात भोगी उत्सवापासून होते. यानिमित्त चेन्नईत नागरिकांनी आपापल्या घरांसमोर केलेल्या होळीच्या धुरामुळे आसमंतात धुराचे दाट धुके पसरले. यामुळे शनिवारी पाहाटे 4 पासून सकाळी 8 वाजता पर्यंत एकही विमान उड्डाण होऊ शकले नाही. - मुंबईतील पालघरमध्ये समद्रात बोट उलटून 40 विद्यार्थी बेपत्ता झाले असल्याची बातमी आहे. पालघर जिल्ह्यातील के.एल.पोंडा हायस्कूलचे 11वी आणि 12 वीचे विद्यार्थी बोटीतून सहलीला निघाले होते. डाहणू जवळ बोट उलटली. दुपारी 2.30 वाजतापर्यंत यातील 32 विद्यार्थ्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. 2 विद्यार्थींनीचा मृत्यू झाला असून 6 विद्यार्थ्यांचा शोध सुरु आहे. 
- या बातमी पाठोपाठच मुंबईत एक हेलिकॉप्टर बेपत्ता असल्याची बातमी आली. काही वेळातच वृत्तसंस्थेने सांगितले की ओएनजीसीचे कर्मचारी घेऊन जाणारे हेलिकॉप्टर डाहणूजवळील समुद्रात कोसळले आहे.  
- याशिवाय महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवारच्या रात्री क्रूजर आणि ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात क्रूजरमधील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कुस्ती खेळून परत येणारे 5 पैलवान होते. 
- रस्ते अपघाताची दुसरी घटना शनिवारी पहाटे 3.30 वाजता कर्नाटकमध्ये घडली. येथे एक बस पुलावरुन खाली कोसळली. यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. ही बस बंगळुरुहून धर्मशाळा येथे जात होती. बसमध्ये 43 प्रवाशी प्रवास करत होते. 

 

देशभरातील घटना... 
जयपूर येथे घराला आग, सिलिंडरचा स्फोट - 5 जणांचा मृत्यू. 
सांगलीत क्रुजर-ट्रॅक्टर अपघात -7 जणांचा मृत्यू. 
कर्नाटक बस अपघात - 5 जण ठार. 
डहाणूमध्ये बोट उलटली - 2 विद्यार्थींनींचा मृत्यू. 6 बेपत्ता 
मुंबईत हेलिकॉप्टर कोसळले - 2 क्रू मेंबरसह 5 कर्मचारी होते. 3 मृतदेह सापडले. 4 जण बेपत्ता आहेत. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, देशभरात  हेलिकॉप्टर कोसळण्यापासून रस्ते अपघात आणि बोट उलटण्याचे अपघात... 

बातम्या आणखी आहेत...