आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटबंदीनंतर बँकांत जमा झाल्या विक्रमी खोट्या नाेटा, अहवालात खुलासा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नोटबंदीनंतर भारतीय बँकांमध्ये सर्वाधिक खोट्या नोटा जमा झाल्या आहेत, तर दुसरीकडे यादरम्यान संशयित व्यवहारात ४८० टक्क्यांची वाढ झाली आहे. देशात ८ नाेव्हेंबर २०१६ रोजी नोटबंदीनंतर बँकांमध्ये संशयितरीत्या जमा झालेल्या रकमेसंदर्भातील पहिल्याच अहवालात हा खुलासा झाला आहे. अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या “फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट’ (एफआययू) ने हा अहवाल जारी केला आहे.

 

ही संस्था देशात होणाऱ्या संशयित आर्थिक व्यवहारावर लक्ष ठेवते. या अहवालानुसार, सरकारी, खासगी क्षेत्राव्यतिरिक्त संस्थांमध्ये सामूहिक स्वरूपात ४०० टक्क्यांपेक्षा जास्त संशयित व्यवहार झाले आहेत. वर्ष २०१६-१७ मध्ये एकूण ४.७३ लाखांपेक्षा जास्त असे व्यवहार झाले असल्याचा दावा या अहवालामध्ये करण्यात आला आहे.  


अहवालानुसार आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये एफआययूला बँका अाणि इतर आर्थिक संस्थांच्या वतीने ४.७३ लाख संशयित व्यवहाराचा अहवाल (एसटीआर) मिळाले आहेत. २०१५-१६ च्या तुलनेत यात चारपट वाढ झाली आहे. एसटी आरमध्ये सर्वाधिक प्रकरणे बँकेच्या श्रेणीत समोर आले आहेत. २०१५-१६ च्या तुलनेत यामध्ये ४८९ टक्क्यांची वाढ झाली आहे. आर्थिक संस्थांच्या बाबत ही २७० टक्के वाढ आहे. वर्ष २०१५-१६ मध्ये एकूण १.०५ लाख एसटीआर बनवण्यात आल्या होत्या. यातील ६१,३६१ एसटीआर बँकांच्या वतीने एफआययूला पाठवल्या होत्या. नोटबंदीनंतर त्यांची संख्या वाढून ३,६१,२१५ पर्यंत पोहोचली होती. इतर आर्थिक संस्थांच्या बाबत हा आकडा ४०,०३३ होता, जो नाेटबंदीनंतर वाढून ९४,८३७ वर पोहोचला. सीसीआर म्हणजेच खाेट्या चलनाचा अहवाल, हा व्यवहारांवर आधारित असतो. ज्या वेळी खोट्या नोटा असल्याचे लक्षात येते त्याच वेळी तो बनवला जातो. असे असले तरी किती खोट्या नोटा पकडण्यात आल्या त्याचा उल्लेख नाही.

 

खोट्या चलनाच्या व्यवहारात ७९ % वाढ   
खोट्या चलनाच्या व्यवहाराचा विचार केल्यास २०१६-१७ च्या दरम्यान अशा व्यवहाराच्या संख्येत मागील वर्षीच्या तुलनेत ७९ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०१५-१६ मध्ये खोट्या चलनाच्या अहवालात (सीसीआर) ही संख्या ४.१० लाख होती. २०१६-१७ मध्ये यात ३.२२ लाखांच्या वाढीसह ही संख्या ७.३३ लाखांवर पोहोचली. सीसीआर २००८-०९ पासून काढण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतरचा हा सर्वात मोठा आकडा आहे.

बातम्या आणखी आहेत...