आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्र्यांशी चर्चेनंतरही अण्णा उपाेषणावर ठाम, म्हणाले - फक्त अाश्वासने नकाेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाचे प्रणेते अण्णा हजारे शुक्रवारपासून नवी दिल्लीतील रामलीला मैदानात उपाेषणास बसले अाहेत.  सशक्त लोकपालाची नियुक्ती, कृषीमुल्य अायाेगाची स्थापना अादी मागण्यांसाठी हे अांदाेलन अाहे. 


साेमवारी केंद्र सरकारने महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दूत म्हणून पाठवले होते. महाजनांनी अण्णांशी बराच वेळ चर्चा केली, मात्र ताेडगा निघू शकला नाही. 
दरम्यान, अण्णांच्या बहूतांश मागण्या सरकारला मान्य असून मंगळवारी निश्चित ताेडगा निघेल असा विश्वास महाजन  यांनी व्यक्त केला. मात्र  अखेरच्या श्वासापर्यंत माझे उपोषण सुरूच राहील, असे अण्णांनी ठणकावले. केवळ आश्वासनांवर भागणार नाही तर  मागण्या मान्य करुन अंमलबजावणी करा, अशी अाग्रही भूमिका अण्णांनी कायम ठेवली. 


वजन चार किलोंनी घटले   

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे अण्णा हजारे यांचे  वजन चार किलोंनी घटले आहे, अशी माहिती अण्णा हजारे यांचे डॉक्टर धनंजय यांनी दिली. रोज सकाळी अण्णा हजारे यांची वैद्यकीय तपासणी होते. तसेच सोमवारी सात उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने  त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारीही तीन उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली होती. ते उपोषणकर्ते  सोमवारी पुन्हा उपोषणास बसले आहेत.    

 

देशभरात धरणे आंदोलने 
अण्णा हजारे यांच्या उपोषणास रामलीला मैदानावर लोकांचा मोठा पाठिंबा मिळालेला नाही. परंतु देशातील अन्य राज्यांतून त्यांच्या समर्थनार्थ कँडल मार्च काढण्यात येत आहेत. लोकांनी जागोजागी धरणे आंदोलन सुरू केले आहे. रविवारी जुन्या दिल्लीतील चांदणी चौकात लोकांनी कँडल मार्च काढला.