आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबालासोर- ५ हजार किमीपेक्षा अधिक अंतरावरील लक्ष्याचा वेध घेण्याची क्षमता असलेल्या ‘अग्नी ५’ या क्षेपणास्त्राची गुरुवारी भारताने यशस्वी चाचणी केली. ओडिशाच्या समुद्रातील बेटावर सकाळी ९.५४ वाजता ही चाचणी यशस्वी झाली. या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे आता उत्तर चीनसह पाकिस्तानही टप्प्यात आला आहे.
संपूर्ण स्वदेशी
संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या या क्षेपणास्त्राची उंची १७ मीटर, तर व्यास २ मीटर आहे. वजन ५० टन आहे. पाक व चीनकडून धोका लक्षात घेऊन अग्नि मालिकेतील हे क्षेपणास्त्र विकसित केलेे. दीड टन वजनाची अण्वस्त्रे हे क्षेपणास्त्र वाहून नेऊ शकते.
DRDO ने काय म्हटले
- डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) च्या सुत्रांनी न्यूज एजन्सीशी बोलताना सांगितले की, अग्नि 5 देशातील सर्वात लाबं पल्ल्याची अण्वस्त्रसंपन्न क्षेपणास्त्र आहे. सकाळी 9.55 वाजता अब्दुल कलाम आयलंडमधून ते सोडण्यात आले. या क्षेपणास्त्राने त्याचे काम पूर्ण केले आहे.
- सूत्रांनी सांगितले की, हे मिसाईल तीन टप्प्यांत काम करते. यावेळीही असेच झाले. ते योग्य वेळेवर बंगालच्या खाडीमध्ये कोसळले. अग्नि 5 पूर्णपणे देशी बनावटीचे आहे. त्यासाठी कम्पोझिट रॉकेट मोटारचा वापर केला जातो. तेही भारतात तयार करण्यात आले आहे.
- मिसाइल लाँचिंगबरोबर याचा रियल टाइम डाटाही घेण्यात आला.
चीनही आले आवाक्यात
- या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुले आता आशिया खंडाचा बहुतांश भाग भारताच्या आवाक्यात आला आहे. चीनच्या ईशान्येकडील भागाबरोबरच युरोपही याच्या रेंजमध्ये आहे.
- हे क्षेपणास्त्र 17 मीटर लांब आणि 2 मीटर रूंद आहे. त्याचे वजन जवळपास 50 टन आहे. त्यावर 1 टन चा पे लोड (शस्त्रे) देखिल वाहून नेता येऊ शकतो.
अग्निची वैशिष्ट्ये ?
- 1000 किलोपर्यंतची शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता. तक वॉरहेड ले जा सकती है।
- 17 मीटर लांबीचे अग्नि-5 चे वजन 50 टन आहे.
- लाँचिंग सिस्टीममध्ये कॅनस्टर टेक्निकचा वापर केला आहे.
- त्यामुळे क्षेपणास्त्र सहजपणे वाहून नेता येते.
- जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र सहज शत्रूच्या रडारमध्ये येत नाही.
- मिसाइलचे तीन टप्पे आहेत. ते सॉलिड फ्यूलद्वारे चालते. अनेक न्युक्लियर वॉरहेड एकत्र सोडता येऊ शकतील. एकदा सोडल्यानंतर ते थांबवता येणार नाही.
अशी वाढली अग्निची रेंज
- अग्नि 1 : 700 KM
- अग्नि 2 : 2000 KM
- अग्नि 3 आणि 4 : 3500 KM
- अग्नि 5 : 5000 KM
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.