आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटल बिहारी वाजपेयींच्या प्रकृतीत सुधारणा: AIIMS, भेटीसाठी पोहोचले योगी आदित्यनाथ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाजपेयी तीनवेळा देशाचे पंतप्रधान झाले होते. सोमवारी त्यांना एम्समध्ये दाखल केले. - Divya Marathi
वाजपेयी तीनवेळा देशाचे पंतप्रधान झाले होते. सोमवारी त्यांना एम्समध्ये दाखल केले.

नवी दिल्ली - माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे एम्सने जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटले आहे. वाजपेयी यांना सोमवारी एम्समध्ये दाखल करण्यात आले होते, बुधवारी दुपारी 4 वाजता जारी केलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये म्हटले आहे, की गेल्या 48 तासांत त्यांच्या प्रकृतीमध्ये चांगली सुधारणा झाली आहे. किडनी, ह्रदयाचे ठोके, ब्लड प्रेशर सर्व नॉर्मल आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे, की येत्या काही दिवसांमध्ये ते पूर्णपणे स्वस्थ होतील आणि त्यांची हॉस्पिटलमधून सुटी केली जाईल. बुधवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. 

 

11 जून रोजी एम्समध्ये दाखल केले 
- वाजपेयी यांना 11 जून रोजी यूरिन इन्फेक्शनमुळे दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले. सुरुवातील त्यांचे हे रुटीन चेकअप असल्याचे सांगण्यात आले होते. 
- वाजपेयींना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर सर्व प्रथम काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी भेटीला गेले. त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांची रिघ लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या प्रकृतीची एम्समध्ये जाऊन विचारपूस केली. 

 

याआधी 2015 मध्ये समोर आला होता वाजपेयींचा फोटो 
- वाजपेयींचा फोटो 2015 मध्ये समोर आला होता. तेव्हा तत्कालिन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी राजकीय शिष्टाचार बाजूला ठेवून वाजपेयींच्या घरी जाऊन त्यांना सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्नने सन्मानित केले होते. 

बातम्या आणखी आहेत...