आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानाला उशीर झाल्याने प्रवाशांचा मंत्र्यांना घेराव; एअर इंडियाचे तीन अधिकारी निलंबित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- नागरी उड्डयनमंत्री अशाेक गजपती राजू हे प्रवास करत असलेल्या विमानाच्या उड्डाणास विलंब झाल्याने एअर इंडियाने तीन अधिकाऱ्यांना निलंबित केले, तर चालकाला सक्त ताकीदवजा इशारा दिला. बुधवारी दिल्लीहून विजयवाडाकडे जाणाऱ्या विमानाच्या उड्डाणास दीड तास विलंब झाल्याने प्रवाशांनी विमानात असलेले मंत्री राजू यांना घेराव घालून घाेषणा दिल्या.


एअाय-४५९ हे विमान सुमारे १२५ प्रवाशांना घेऊन दिल्लीहून विजयवाडाकडे जाणार हाेते; परंतु निश्चित वेळेनंतरही विमानाने उड्डाण केले नाही. त्यामुळे प्रवाशांनी गाेंधळ घालण्यास सुरुवात केली. या वेळी त्यांना मंत्री राजू हेदेखील विमानात असल्याचे कळले. प्रवाशांनी त्यांना भेटून त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करत घाेषणा दिल्या. त्यानंतर राजू यांनी मुख्य व्यवस्थापकीय संचालक प्रदीपसिंह खराेला यांच्याशी चर्चा केली व विलंबाचे कारण विचारत कारवाई करण्यास सांगितले. 

 

खराेला यांनी बाेलावली बैठक 
या प्रकारानंतर खराेला यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बाेलावली. अधिकाऱ्यांत समन्वय नसल्याने विमानाच्या उड्डाणास विलंब झाला. त्यामुळेच खराेला यांनी कठाेर कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...