आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • All Muslim Personal Law Board Says There Is No Change In Its Stand On The Ayodhya Issue

बाबरी मशीद बांधण्याची लढाई सुरूच राहील, जागा बदलणार नाही; जमीन गिफ्ट देणार नाही : मुस्लिम लॉ बोर्ड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (AIMPLB) ने म्हटले आहे की, अयोध्या प्रकरणात त्यांची भूमिका बदलणार नाही. एकदा मशीद बांधली तर ती नेहमीसाठी मशीदच राहील. AIMPLB ने ही बाबा हैदराबादेत सुरू असलेल्या 26व्या नियोजन बैठकीत स्पष्ट केली. तथापि, अयोध्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावाणी सुरू आहे. कोर्टाने आता वाल्मीकी रामायण, रामचरितमानस आणि गीतासहित 20 धार्मिक पुस्तके वापरून काढलेल्या तथ्यांचे इंग्रजी अनुवादाचे आदेश दिले आहेत. यूपी सरकारला 2 आठवड्यांत हा अनुवाद सर्व पक्षकारांना द्यावा लागेल. पुढील सुनावणी 14 मार्च रोजी होईल.

 

"खुदा को जवाब देना होगा..."
- ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे अध्यक्ष आणि बोर्डाचे मेंबर असदुद्दीन ओवैसी शनिवार म्हणाले की, "जिथे बाबरी मशिदीची बाब आहे, हे स्पष्टपणे सांगता येईल की एकदा मशीद बनली तर ती नेहमीसाठीच मशीद राहील. यात कोणताही समझौता केला जाऊ शकत नाही. जर एखाद्याने मशिदीच्या मुद्द्यावरून माघार घेतली तर त्याला खुदाला उत्तर द्यावे लागेल."
- "ट्रिपल तलाक बिल राज्यसभेत पेंडिंग आहे. हे बिल मुस्लिम समाजाला मान्य नाही, कारण हे संविधानाच्या विरुद्ध आहे. ट्रिपल तलाक बिल संविधानाच्या त्या तरतुदींविरुद्ध आहे, ज्या अल्पसंख्याकांसाठी आहेत."
- तथापि, शुक्रवारी बोर्डाने म्हटले की, मशिदीच्या मुद्द्यावर आम्ही योग्य न्याय आणि समान सन्मानाच्या आधारे चर्चेसाठी तयार आहोत.

- दुसरीकडे, बोर्डाचे व्हाइस प्रेसिडेंट मौलाना कल्बे सादिक म्हणाले की, अयोध्येत मंदिर जरूर बनवले पाहिजे, परंतु विद्येचे मंदिर बनवावे. ते म्हणाले की, हा वाद जेव्हा लोक मिटवू इच्छितील तेव्हा आपोआप मिटेल.
- "मदरशांतील शिक्षणापेक्षा जास्त चांगले आधुनिक शिक्षण आहे. आम्ही जेव्हा शिक्षणावर बोलतो तेव्हा आमची अपेक्षा असते ते मॉडर्न एज्युकेशन, धार्मिक नाही. मला मुसलमानांकडूनच समस्या भेडसावत आलेली आहे, हिंदूंकडून नाही. हिंदूंनी नेहमी सन्मान आणि प्रेम दिले आहे. मुस्लिमांना विचारा की, दीन काय आहे, धर्म काय आहे. तर ते म्हणतील, नमाज पढणे, रोजे ठेवणे, हज करणे. या सर्व धार्मिक प्रथा आहेत,  दीन नाही."

 

आर्ट ऑफ लिव्हिंगनेही बोलावली होती बैठक
- 8 फेब्रुवारी रोजी आर्ट ऑफ लिविंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी बंगळुरूत मुस्लिम नेत्यांची बैठक बोलावली होती.
- मीटिंगनंतर सुन्नी वक्फ बोर्ड, मुस्लिम लॉ बोर्डसहित अनेक नेत्यांनी रविशंकर यांना सांगितले होते की, ते अयोध्या प्रकरणात कोर्टाबाहेर सेटलमेंट करण्यासाठी तयार आहेत. असेही म्हटले होते की, ते मशीद दुसऱ्या जागी स्थलांतरित करण्याच्या विचारालाही पाठिंबा देतात.

 

सुप्रीम कोर्टात काय झाले?
- कोर्टाने हे स्पष्ट केले होते की, अयोध्या वादाला धार्मिक अंगाने नाही तर जमीन विवादाच्या रूपाने पाहिले जाईल.
- सीजेआय दीपक मिश्रा यांच्यासह 3 न्यायमूर्तींच्या स्पेशल बेंचसमोर सुनावणी सुरू होताच, याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी म्हटले की, अयोध्या विवाद लोकांच्या भावनाशी निगडित आहे. यावर चीफ जस्टिस म्हणाले- असे युक्तिवाद आम्हाला पसंत नाहीत, हा फक्त एक जमिनीचा वाद आहे.

 

अयोध्या प्रकरणात 3 पक्षकार
1. सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड 
2. राम लला विराजमान 
3. निर्मोही आखाडा

- या 3 मुख्य पक्षकारांशिवाय एक डझन इतरही पक्षकार आहेत. 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत कारसेवकांनी वादग्रस्त बाबरी ढाचा ध्वस्त केला होता.

बातम्या आणखी आहेत...