आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 पैकी 3 पोटनिवडणुकांत भाजप विजयी, शहा म्हणाले-काँग्रेस यालाही नैतिक विजय म्हणेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अरुणाचल आणि उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी रविवारी काँग्रेसला टोमणा मारला. शहा यांनी ट्विटरवर पोस्ट केले, काँग्रेस किमान आता तरी हा नैतिक विजय आहे असा दावा करणार नाही. गुजरात आणि हिमाचलमध्ये निवडणुकांत पराभवानंतर आता आता अरुणाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमध्येही लोकांनी त्यांनी रिजेक्ट केले. लोक काँग्रेसचा भ्रष्टाचार आणि कुशासन स्वीकारण्यास तयार नाहीत. 


काँग्रेसने म्हटले होते, गुजरात निवडणूक हा नैतिक विजय 
- गुजरात निवडणुकीत भाजपने 150 जागांचा दावा केला होता. पण पक्षाला 99 जागांवरच विजय मिळवता आला. तर काँग्रेसने 77 जागी विजय मिळवला. 
- काँग्रेसने हे निकाल म्हणजे भाजपसाठी धक्का आणि काँग्रेससाठी नैतिक विजय असल्याचे म्हटले होते. 


5 पैकी 3 ठिकाणी भाजपला विजय 
- 5 सीटों पर हुए उपचुनाव में बीजेपी को कुल 3 सीटों पर जीत मिली है। 
- अरुणाचल प्रदेशच्या पक्के-केसांग जागेवर भाजपचे बीआर वानखेडे यांनी काँग्रेस उमेदवार आणि उपमुख्यमंत्री राहिलेले कमेंग दोलो यांचा पराभव केला. तर लिकाबली जागेवर भाजपचे उमेदवार करदो नीग्योर यांनी पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचलच्या गुमके रिबा यांचा पराभव केला. 
- त्याशिवाय उत्तर प्रदेशच्या सिकंदरा मतदारसंघावरही भाजपने ताबा मिळवला. येथे भाजपचे अजित पाल सिंह यांनी समाजवादी पक्षाच्या सीमा सचान यांना 7 हजारहून अधिक मतांनी पराभूत केले. 


पश्चिम बंगाल आणि तमिळनाडूतील निकाल 
- तमिळनाडूच्या के आरके नगर पोटनिवडणउकीत अपक्ष उमेदवार टीटीव्वी दिनाकरण यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. 
- पश्चिम बंगालच्या सबंग विधानसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या गीता राणी भुनिया यांनी माकपच्या रीता मोंडल यांचा पराभव केला. 

 

बातम्या आणखी आहेत...