आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ बच्चन ट्विटरवर राहुल गांधींसह अनेक काँग्रेस नेत्यांचे झाले फॉलोअर, नव्याने वाढली संख्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर राहुल गांधी यांच्यासह काही काँग्रेस नेत्यांना फॉलो केले आहे. काँग्रेससाठी हा 'अलभ्य लाभ' म्हटल्या जात आहे. काँग्रेस नेत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. काँग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी म्हणाले, की त्यांनी मला फॉलो केले यासाठी मी त्यांना धन्यवाद देतो. त्यांच्या फिल्म फर्स्ट-डे फर्स्ट-शो पाहात आम्ही मोठे झालो. 70-80 च्या दशकातील तो काळ डोळ्यासमोर आला आहे. 

 

कोणत्या काँग्रेस नेत्यांना फोलो करत आहेत अमिताभ बच्चन 
- अमिताभ बच्चन यांनी सुरुवातीला राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या अधिकृत अकाऊंटला फॉलो केले होते. आता त्यांनी ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल, पी. चिदंबरम, अहमद पटेल, अशोक गहलोत, अजय माकन, ज्योतिरादित्य सिंधिया, सचिन पायलट आणि सीपी जोशी यांना फॉलो करणे सुरु केले आहे. 
- याशिवाय मनीष तिवारी, शकील खान, संजय निरुपम, रणदीप सुरजेवाला, प्रियंका चतुर्वेदी आणि संजय झा यांनाही ते फॉलो करत आहेत. 
- एकेकाळी राजीव गांधी यांचे मित्र अशी अमिताभ बच्चन यांची ओळख होती. सध्या ते गुजरातचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. 
- अमिताभ बच्चन यांचे ट्विटरवर सध्या 33.1 मिलियन अर्थात 3 कोटी 31 लाख फॉलोअर्स आहेत. ते स्वतः फक्त 1730 जणांना फॉलो करतात. 

 

देशातील अनेक नेत्यांना फॉलो करणे सुरु केले
- अमिताभ यांनी फक्त काँग्रेस नेत्यांना फॉलो करणे सुरु केले असे नाही तर या महिन्यात त्यांनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू यादव, त्यांची मुलगी मीसा भारती, आरजेडीचे ऑफिशियल अकाऊंट, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, सीपीआय नेते सीताराम येचुरी, नॅशनल काँन्फ्रन्सचे नेते उमर अब्दुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे यांनाही फॉलो केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...