आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजार यांच्या आंदोलनात आता फक्त अशा लोकांनाच (स्त्री-पुरुष) प्रवेश असणार आहे जे भविष्यात राजकारणात जाणार नाही असे वचन देतील. अण्णा हजारेंच्या आंदोलनातून आम आदमी पक्ष उभा राहिला. नुसता पक्षच उभा राहिला नाही तर या पक्षाने दिल्ली विधानसभेवर झेंडा फडकवला आहे. अण्णा हजारे आता पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. त्यांनी म्हटले आहे, की जे लोक आंदोलनातून राजकारणात जाणार नाही असे शपथपत्र लिहून देतील त्यांनाच सहभागी करुन घेणार आहे. अण्णा त्यांचे एकेकाळचे सहकारी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर नाराज आहेत. त्यांनी ही नाराजी अनेकदा बोलून दाखवली आहे.
'केजरी' ना मंत्री असते ना मुख्यमंत्री
- अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी अभियानात केजरीवाल हे त्यांचे अतिशय जवळचे साथीदार होते. तेव्हा अनेक ठिकाणी अण्णांसोबत केजरीवाल दिसायचे. केजरींबद्दल अण्णांनी जाहीर नाराजी व्यक्त केलेली आहे.
- मंगळवारी रात्री पुन्हा एकदा अण्णांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली. म्हणाले, 'मी आता जे शपथपत्र लिहून घेत आहे तसे आधी केले असते तर केजरीवाल ना मुख्यमंत्री असते ना मंत्री.'
अण्णा आंदोलनातील स्वंयसेवकांसाठी नव्या अटी
- अण्णा हजारे म्हणाले, 'ज्यांचे चारित्र्य चांगले आहे. समाजामध्ये ज्यांना मान-सन्मान आहे आणि देशासाठी बलिदान देण्याची ज्यांची तयारी आहे असेच लोक आता माझ्या आंदोलनात असतील.'
- ते म्हणाले, 'असेच लोक एक शपथपत्र लिहून देतील. ज्यामध्ये स्पष्ट लिहिलेले असेल की भविष्यात आम्ही कोणत्याही राजकीय पक्षात जाणार नाही. निवडणूक लढणार नाही. ते फक्त आंदोलनाचा भाग असतील आणि देश व समाजासाठी एक दिशादर्शक काम करतील.'
23 मार्चला रॅलीचे आयोजन
- अण्णा हजारे पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत आहेत. 23 मार्चला नवी दिल्ली येथे भव्य रॅली करुन आंदोलनाचे रणशिंग फुंकणार आहेत. ते म्हणाले, देशातली शेतकऱ्याची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. गेल्या 22 वर्षांमध्ये जवळपास 12 लाख शेतकाऱ्यांनी आत्महत्या केली. या काळात विविध पक्ष सत्तेवर आले मात्र एकाही सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे राजकारण केलेले नाही.
- अण्णा हजारे म्हणाले, ' गेल्या काही दिवसांत ओडिशा, मध्यप्रदेश, तामिळूनाडू, आसाम, अरुणाचल प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटक या राज्यांचा दौरा केला. या दरम्यान शेतकरी आणि सामान्य माणसांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.'
- अण्णा म्हणाले, केजरीवालांनी राजकारणात जायला नको होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.