आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Another Shock For Kejriwal 9 Advisers To Delhi Government Sacked By Union Home Ministry

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्ली सरकारचे 9 सल्लागार केंद्रीय गृहमंत्रलयाकडून बरखास्त, मंजुरी घेतली नव्हती -केंद्र

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि केंद्र सरकार पुन्हा समोरासमोर आले आहेत. दिल्ली सरकारने नियुक्त केलेले 9 सल्लागार केंद्रीय गृहमंत्रालयाने बरखास्त केले. या पदांसाठी दिल्ली सरकारने अर्थमंत्रालयाची मंजुरी घेतली नव्हती, त्यामुळे या नियुक्त्या रद्द केल्या जात आहेत असे केंद्राने स्पष्ट केले. 

 

नियुक्ती रद्द केलेल्या सल्लागारांमध्ये उप-मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे सल्लागार आतिशी मारलेना यांचाही समावेश आहे. त्यांना राज्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी 1 रुपयाच्या मासिक टोकनवर नियुक्त करण्यात आले होते असे दिल्ली सरकारने म्हटले होते.

 

काय आहेत केंद्रीय गृहमंत्रालयाचे आदेश

- नियुक्ती रद्द केलेल्या सल्लागारांमध्ये उप-मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचे सल्लागार आतिशी मारलेना यांचाही समावेश आहे. त्यांना राज्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी 1 लाख रुपयांच्या मासिक टोकनवर नियुक्त करण्यात आले होते असे दिल्ली सरकारने म्हटले होते. 
- गृहमंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे, दिल्ली सरकारने या पदांची निर्मिती करण्यासाठी केंद्र सरकारची कुठल्याही प्रकारची मंजुरी घेतली नाही. अशा प्रकारची पदे निर्माण करण्यासाठी केंद्राची प्राथमिक मंजुरी मिळविणे आवश्यक आहे. तरीही कायद्याची परवानगी नसताना दिल्ली कॅबिनेटने हा निर्णय घेतला होता. 
- या सर्व पदांवर झालेली नियुक्ती कायद्याच्या विरोधात असल्याने त्या संदर्भात दिल्ली सरकारने काढलेला कुठलाही आदेश मान्य करता येणार नाही. त्यामुळे, दिल्ली सरकारने केलेल्या या सर्व नियुक्त्या रद्द केल्या जात आहेत असे आदेशात स्पष्ट करण्यात आले. 

 

आपची प्रतिक्रिया...

आपचे नेते राघव चढ्ढा यांनी केंद्र सरकारच्या या कारवाईला नागरिकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी झालेला प्रयत्न असे संबोधले आहे. देशात बलात्कारांचे मुद्दे पेटत असताना सरकारने हा डाव केला असे त्यांनी ट्वीट केले.

बातम्या आणखी आहेत...