आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचरा फेकण्याच्या व्हिडिओचा वाद, विराट-अनुष्काला अरहान सिंहने पाठवली नोटीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विराटने पोस्ट केलेल्या व्हिडिओतील स्क्रीनशॉट. - Divya Marathi
विराटने पोस्ट केलेल्या व्हिडिओतील स्क्रीनशॉट.

- अरहानने म्हटले, आता चेंडू विराट आणि अनुष्काच्या कोर्टात आहे. 

- काँग्रेस प्रवक्ते संजय झा यांचा विराट आणि अनुष्काला प्रश्न - कितनी पब्लिसिटी हवी?

 

मुंबई - रस्त्यावर कचरा फेकणारे अरहान सिंह यांना रागावणे अनुष्का शर्माला चांगले महागात पडले आहे. या घटनेवरून अनुष्का आणि विराट कोहलीला अरहान यांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. त्यात अरहानने सोशल मीडियावर त्यांचा वाद झाल्याचा आरोप लावला आहे. 


विराट कोहलीने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केल्यानंतर हे प्रकरण पेटले. त्या व्हिडिओत अनुष्का लक्झरी कारमघ्ये बसलेल्या अरहानला रस्त्यावर प्लास्टीकचा कचरा फेकण्याबद्दल सुनावत होती. अनुष्का त्याला यात म्हणतेय, तुम्ही रस्त्यावर कचरा का फेकत आहात? तुम्ही प्लास्टीकची बाटली रस्त्यावर का फेकत आहात? यापुढे लक्षात ठेवा तुम्ही रस्त्यावर अशाप्रकारे बाटली फेकू शकत नाही.

 

यानंतर अरहानने अनुष्का आणि विराटला कायदेशीर नोटीस बजावली आहे. न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार अरहान म्हणाला की, आता चेंडू विराट आणि अनुष्काच्या कोर्टात आहे. मी आता काहीही म्हणणार नाही. त्यांच्या उत्तराची वाट पाहणेच योग्य ठरेल. 


काँग्रेस नेत्यानेही उपस्थित केले प्रश्न 
कांग्रेस प्रवक्ते संजय झा यांनीही ट्वीटरवर विराट आणि अनुष्काला प्रश्न केला आहे. त्याल लिहिले, सेलिब्रिटीजने चांगले काम करताना प्रत्येकवेळी स्वतःला प्रमोट करणे गरजेचे नाही. तुम्हाला आणखी किती पब्लिसिटी हवी. 

 

पुढे पाहा, विराटने पोस्ट केलेला व्हिडिओ...

 

बातम्या आणखी आहेत...