आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

165 हून अधिक लोकांना ठार मारणाऱ्या आरिजला अटक; इंडियन मुजाहिदीनचा अतिरेकी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली पोलिसांच्या ताब्यात जुनैद. - Divya Marathi
दिल्ली पोलिसांच्या ताब्यात जुनैद.

नवी दिल्ली- सुमारे ९ वर्षे फरार असलेल्या इंडियन मुजाहिदीन (आयएम)चा अतिरेकी आरिज खान ऊर्फ जुनेद यास दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली, अहमदाबाद, उत्तर प्रदेश आणि जयपूर येथे १६५ हून अधिक लोकांची हत्या घडवून आणणाऱ्या स्फोटात त्याचा हात आहे. त्याच्यावर राष्ट्रीय तपास संस्थेने १० लाख व दिल्ली पोलिसांनी ५ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने जुनेदला भारत-नेपाळ सीमेवर अटक केली. विशेष सेलचे उपायुक्त प्रमोदसिंह कुशवाह यांनी सांगितले, १९ सप्टेंबर २००८ रोजी दिल्लीतील जामिया नगर येथे झालेल्या चकमकीत जुनैद बटला हाऊसमध्ये हजर होता. परंतु तो पळून जाण्यात यशस्वी ठरला. चकमकीत मारला गेलेला अतिरेकी आतिफ अमीनशी त्याचे संबंध होते. तो बॉम्ब तयार करण्यात निष्णात होता. २००७ उत्तर प्रदेशात स्फोट, २००८ दिल्लीत साखळी स्फोट, जयपूर साखळी स्फोट आणि अहमदाबाद स्फोटात त्याचा हात होता. या स्फोटात १६५ हून अधिक लोक ठार झाले होते.  


विशेष म्हणजे, बटला हाऊस चकमकीत इंडियन मुजाहिदीनचे दोन दहशतवादी मारले गेले होते. तर दिल्ली पोलिसातील निरीक्षक मोहनचंद शर्मा शहीद झाले होते. सत्र न्यायाधीशांनी २०१३ मध्ये आयएम दहशतवादी शहजाद अहमदला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. 

 

पाच स्फोटांमध्ये हात 
- दिल्ली पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे, की पकडलेल्या दहशतवाद्याचे नाव आरिज खान उर्फ जुनैद आहे. 
- पाच बॉम्बस्फोटांमद्ये जुनैदचा हात असल्याचे म्हटले जाते. 
- सध्या अधिकृतरित्या त्याच्या अटकेची माहिती देण्यात आली नाही.


बाटला हाऊस येथे काय झाले होते 
- 13 सप्टेंबर 2008 रोजी दिल्लीमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला होता. जवळपास 80 लोक जखमी होते. या स्फोटानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या प्रकरणाची चौकशी केली. 
- सीरियल ब्लास्ट प्रकरणातील काही लोक बाटला हाऊसमधील रुम नंबर एल-18 मध्ये दडून बसले असण्याची माहिती स्पेशल सेलला मिळाली होती. 
- स्पेशल सेलच्या टीमने बाटला हाऊस येथे छापा मारला तेव्हा फ्लॅटमधून पोलिसांनीवर फायरिंग करण्यात आले. यात पोलिस अधिकारी मोहनलाल शर्मा शहीद झाले होते. 
- स्पेशल सेलने प्रत्युत्तरात केलेल्या फायरिंगमध्ये दोन दहशतवाद्यांना मारण्यात यश आले होते. दोन जणांना अटक करण्यात आली होती तर एक फरार झाला होता. या फरार दहशतवाद्यालाच अटक झाली आहे. 

बातम्या आणखी आहेत...