आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोकलाममध्ये चीनी सैनिकांच्या उपस्थितीवर लष्कर प्रमुख रावत म्हणाले- काही गंभीर बाब नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - डोकलाम सेक्टरमध्ये चीनी सैनिकांचा वावर पुन्हा वाढायला लागला आहे, मात्र ही फार गंभीर बाब नसल्याचे भारतीय लष्कर प्रमुख बिपीन रावत म्हणाले आहेत. बुधवारी रायसीना डायलॉग कार्यक्रमात लष्कर प्रमुख सहभागी झाले होते. ते म्हणाले, डोकलामधील एका भागात चीनी सैनिकांची उपस्थिती आहे, मात्र चिंता करण्या एवढी त्यांची संख्या नाही. जनरल रावत म्हणाले, चीनी सैनिकांनी काही इन्फ्रास्ट्रक्चरचे काम केले आहे, मात्र ते कायमस्वरुपाचे असे नाही. जनरल रावत यांनी हेही सांगितले की दोन्ही देशांमध्ये सध्या डोकलामच्या आधी जशी स्थिती होती तशीच आता आहे. 

 

पूर्वोत्तर सीमेवर चीनी सैनिकांचे रस्ते निर्माणाचे जे साहित्य आहे ते थंडी वाढल्यामुळे ते सोडून गेले असण्याची शक्यता असल्याचे जनरल रावत म्हणाले. लष्कर प्रमुख जनरल रावत म्हणाले, की चीनी सैनिक पुन्हा आले तर त्यांच्याशी सामना करण्यासाठी भारतीय सैनिक तयार आहेत. 
जनरल रावत म्हणाले, आम्ही बॉर्डरवर पर्सोनल मिटिंग सुरु केली असून नियमीतपणे मिटिंग सुरु आहे. ग्राऊंड लेवलवर कमांडरचा संवाद होत असतो. डोकलाममध्ये सध्या पूर्वीसारखी परिस्थिती असल्याचे लष्कर प्रमुख म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...