आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू/नवी दिल्ली - लाइन ऑफ कंट्रोल (LoC) येथे गुरुवारपासून सुरु झालेली फायरिंग शनिवारीही सुरु होती. पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबारात शनिवारी आर्मीचा 23 वर्षांचा एक जवान शहीद झाला. न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार शहीद जवानाचे नाव मनदीप सिंह आहे. याशिवाय आणखी दोन जणांचा या गोळीबारात मृत्यू झाला आहे. ही फायरिंग पुंछ आणि कृष्णा घाटी सेक्टरमध्ये झाली. भारतीय लष्कर आणि बीएसएफचे जवान पाकिस्तानच्या गोळीबाराला जशास तसे उत्तर देत आहेत.
उखळी तोफांचा मारा
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानकडून फायरिंगमध्ये आधुनिक शस्त्रांचा वापरत होत आहे. अरनिया आणि कृष्णा खोऱ्यात नागरी वस्तीलाही पाककडून लक्ष्य केले जात आहे. नागरी भागात मोठे नुकसान झाले आहे.
- कानाचक भागातही पाकिस्तानकडून उखली तोफांचा मारा होत आहे. कृष्णा घाटी सेक्टरमध्ये जवान मनदीप सिंह शहीद झाले. ते पंजाबच्या संगरुर जिल्ह्यातील रहिवासी होते.
पाकिस्तानचे चार सैनिक ठार
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीएसएफ आणि आर्मीने प्रत्युत्तरात केलेल्या फायरिंगमध्ये पाकिस्तानचे चार रेंजर्स मारले गेले. याशिवाय त्यांच्या लष्कराचा एक पेट्रोलियम डेपोही उद्धवस्त करण्यात आला आहे.
- अशीही माहिती आहे, की आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानकडून लाऊड स्पिकरवरुन स्थानिकांना नागरी वस्ती सोडून जाण्यास सांगितले जात आहे.
- केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह शनिवारी म्हणाले, शहीदांच्या कुटुंबियांसाठी आम्ही जेवढे केले तेवढे कमीच आहे. आर्थिक मदत तिथे गौण ठरते. सैनिकाच्या जीवनापुढे पैशांना काहीच मोल नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.