आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवालांनी अकाली दलाच्या नेत्याची मागितली माफी, कुमार विश्वासांनी केली बोचरी टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केजरीवालांनी मजीठिया यांची माफी मागितली. - Divya Marathi
केजरीवालांनी मजीठिया यांची माफी मागितली.

नवी दिल्ली - आप नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबचे माजी मंत्री विक्रमसिंह मजीठिया यांची गुरुवारी माफी मागितल्यानंतर आपच्या पंजाब युनिटसह कुमार विश्वास यांनी त्यांच्यावर टिका केली आहे. केजरींनी मजीठियांवर आरोप केला होता की ते ड्रग्स माफिया आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर विक्रमसिंह मजीठिया यांनी त्यांच्यावर अब्रुनुकसानिचा दावा केला होता. गुरुवारी केजरीवालांनी अमृतसर कोर्टात माफीनामा सादर केला. त्यानंतर मजीठिया यांनी केस मागे घेतली आहे.  

 

केजरींच्या माफीने आपच्या पंजाब यूनिटला धक्का 
- आम आदमी पार्टीच्या पंजाब यूनिटसोबत कुमार विश्वास या केजरींच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावर बोचरी टीका केली आहे. कुमार विश्वास यांनी ट्विट करुन म्हटले,  ''क्या हम उस शख्स पर थूकें, जो थूक कर चाटने में माहिर है।'' 
- आपचे नेते आणि पंजाब विधानसभेतील विरोधीपक्ष नेते सुखपालसिंह खैरा म्हणाले, केजरीवालांनी माफी मागण्यामुळे आम्हाला धक्का बसला आहे. एवढा मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्यांनी एकदाही आमच्यासोबत चर्चा केली नाही. 
- आपचे आमदार कंवर संधू म्हणाले, की तुम्ही जर सत्याच्या बाजूने उभे असाल तर तुम्हाला मानहानिला सामोरे जावे लागते. मी फक्त माफियांनी दाखल केलेल्या केसेचा सामना करत नाही तर त्यांच्या धमक्याही येत असता. केजरींच्या माफीनाम्याने तरुणांना नाराज केले आहे. 

 

कुमार विश्वास यांचे ट्विट
- राज्यसभेचे सदस्यत्व नाकारल्यामुळे नाराज असलेले आप नेते कुमार विश्वास यांनी केजरीवालांनी मजीठिया यांची माफी मागितल्यानंतर ट्विटरवरुन त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 
- कोणाचेही नाव न घेता केलेल्या ट्विटमध्ये कुमार विश्वास म्हणाले, ''एकता बांटने में माहिर है, खुद की जड़ काटने में माहिर है, हम क्या उस शख्स पर थूकें जो खुद, थूक कर चाटने में माहिर है!''


काय म्हणाले होते केजरीवाल 
- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल 2016 मध्ये पंजाब विधानसभा निवडणूक प्रचारात आक्रमक झाले होते. तत्कालिन अकाली सरकारचे मंत्री आणि केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर यांचे छोटे बंधू विक्रमसिंह मजीठिया यांना ड्रग्स माफिया म्हटले होते. एवढेच नाही तर पंजाबमध्ये आपचे सरकार आले तर मजीठियांची कॉलर पकडून त्यांना तुरुंगात डांबू असा इशारा केजरीवालांनी दिला होता. 
- मजीठिया ड्रग्स ट्रेडमध्ये सहभागी असल्याचा आरोप केजरींनी केला होता. याशिवाय प्रकाशसिंह बादल सरकार डग्स माफियांना आणि या धंद्याला अभय देत असल्याचा आरोप केला होता. 


जेटलींवरही केला भ्रष्टाचाराचा आरोप, गडकरींची मागितली माफी 
- केजरीवाल यांनी कोणावर आरोप करण्याची आणि नंतर माफी मागण्याची ही पहिली वेळ नाही. याआधी त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. 
- जेटली 13 वर्षे दिल्ली क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष होते. या काळात त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा केजरींनी आरोप करत सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात कँपेन चालवले होते. 
- त्यानंतर केजरींसह पाच आप नेत्यांवर अब्रुनुकसानिचे दिवाणी आणि फौजदारी खटले जेटलींनी दाखल केले होते. जेटलींनी अब्रुनुकसानीचा 10 कोटींचा दावा दाखल केला होता. 
- या प्रकरणात केजरींचे वकील असलेले ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी केजरींची केस सोडली होती आणि त्यांनी जेटलींनी माफी मागावी असा सल्ला दिला होता. 
- त्याआधी केजरींनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हरियाणाचे भाजप नेते अवतारसिंह यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मात्र नंतर या दोन्ही नेत्यांची त्यांनी माफी मागितली होती. 

बातम्या आणखी आहेत...